Couple kiss viral video: सार्वजनिक ठिकाणी किस करणं यांसारख्या घटना खूप सामान्य झाल्या आहेत. आजकाल लोक बिनधास्तपणे आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसमोर खुलेपणाने प्रेम व्यक्त करू लागले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी मुला-मुलींनी ‘Kiss’ करणं, चुंबन घेणं, मिठी मारणं याकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतो. दिल्ली मेट्रोमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अश्‍लील घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल आणि सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. यावरुन बरेच वाद-विवादही झाले, कारवाई झाली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे लोकही चांगलेच संतापले होते. दरम्यान सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजच्या मोकळ्या जागेत उभे असताना एक कपल किस करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे कपल किस करत असताना अनेक विद्यार्थी तेथून जात आहेत. या जोडप्याला किस करताना पाहून एका तरुणाला राग येतो आणि तो असे काही करतो की त्या कपलची चांगलीच फजीती झाली. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की जेव्हा हे कपल एकमेकांना किस करत होते तेव्हा एक तरुण त्या जोडप्याकडे धावत येतो. आणि तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो त्या कपलच्या अंगावर पडतो, तेव्हा त्याच्यासोबतच कपलही जमिनीवर पडतात. ही घटना पाहून आजूबाजूचे लोक घाबरुन गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: थरारक! घराच्या छतावर चालवत होता कार; अंदाज चुकला अन् थेट…गाडीचा अक्षरशः चक्काचूर

हा व्हिडीओ पाहून युजर्सही खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘त्या व्यक्तीला मत्सर वाटला कारण कदाचित तो अविवाहित असेल.’ तर आणखी एका व्यक्तीने सांगितले की, ‘मुलाने आपल्या मैत्रिणीला दुसऱ्या मुलासोबत पाहिले, म्हणूनच त्याने हे केले.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple kissing in public place angry man kicked them viral video on social media trending srk