Couple Kissing in Restaurant Viral Video: प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांना किस करताना दिसतंय, पण किस करताना त्यांच्याबरोबर जे घडतं ते पाहून तुम्ही शॉक व्हाल.

हेही वाचा… लघुशंका पीठामध्ये मिसळली, मालकाला खाऊ घातलं, तीन महिन्यात असं काही घडलं की कुटुंब झालं उद्ध्वस्त, किळसवाणा VIDEO आला समोर

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक कपल एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांच्या समोर बसलेलं दिसत आहे. हे रेस्टॉरंट संपूर्ण रिकामी दिसत आहे. आजूबाजूला एक माणूसही दिसत नाही आहे. तेवढ्यात समोरच्या खुर्चीवर बसलेली तरुणी तिच्या बॉयफ्रेंडजवळ येते आणि त्याच्या मांडीवर बसते. एकाच खुर्चीवर दोघं बसलेले असतात. यानंतर ती तरुणी त्याला किस करायला लागते. एकाच खुर्चीवर बसून किस करण्याच्या नादात त्या खुर्चीचा तोल जातो आणि खुर्चीसकट दोघं खाली पडतात.

हा व्हिडीओ @marathiduniyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “म्हणून म्हणतात जी गोष्ट जिथे करायची असते तिथेच करावी” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १०.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… “नया है वह”, ट्रेनमधून उतरताना तरुणाबरोबर झालं असं काही की…, VIDEO पाहून डोक्यावर माराल हात

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनीयावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, हॉटेलवाल्यांचं नुकसान करून टाकल. तर दुसऱ्याने, “हॉटेल वाल्याने नंतर यांना मारलं असेल” अशी कमेंट केली. “स्वत:चा अपमान करून घेतला” अशीही कमेंट एकाने केली.

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात कॉलेजमध्ये भररस्त्यात कपल्स असं काही करताना दिसले आहेत. सध्याचा हा व्हिडीओ जरा जास्तच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple kissing in restaurant girlfriend boyfriend obscene video went viral on social media dvr