-अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Pre-Wedding Photoshoot In Drainage: लाईटहाऊस जर्नालिसमला काही फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये दावा करण्यात येत होता कि हे एका जोडप्याचे प्री-वेडिंग फोटोशूट आहे, ज्यांनी चक्क एका नाल्यात फोटो काढले आहेत. या फोटोत कपल चक्क नाल्यात दिसतं आहे.प्लॅस्टिक, थर्माकॉलने तुडुंब भरलेल्या गलिच्छ पाण्यात हे जोडपं हसत हसत फोटो काढत आहे. इतकंच नव्हे तर काही फोटोंमध्ये तर ते एकमेकांना किस करतानाही दिसत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Mokka Memes ने हि पोस्ट शेअर केली आणि लिहले, ‘Wedding photoshoot’.

आम्हाला हे फोटो फेसबुकवर व यासंबंधित व्हिडीओ युट्युबवर देखील शेअर होत असल्याचे लक्षात आले.

तपास:

मात्र हे फोटो पाहताना पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ब्लर पार्श्वभूमी आणि स्मूथ अर्थात गुळगुळीत टेक्श्चर. अनेक AI प्रतिमांमधील लोकांची त्वचा अनेकदा जास्त गुळगुळीत आणि कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक टेक्श्चर नसल्याप्रमाणे दाखवली जाते. तसेच केस आणि दातही काही प्रमाणात प्लॅस्टिकसारखे वाटू शकतात. या गोष्टी निदर्शनात आल्यावर आम्ही आमचा तपास सुरु केला. आम्हाला हा मूळ फोटो india.postsen.com या वेबसाईट वर दिसला.

https://india.postsen.com/sports/467606.html

आम्ही त्या नंतर हे चित्र AI निर्मित चित्र शोधून काढणाऱ्या काही ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करून तपास केला. ‘Optic AI or Not’, प्रमाणे हे चारही फोटो AI निर्मित असल्याचे कळले. ‘Maybe’s AI Art Detector’ ने पण असेच काहीसे समान निष्कर्ष दिले. एआय डिटेक्‍ट करणार्‍या दोन्ही ऍप्लिकेशनवर हे चारही फोटो AI वापरून तयार केल्याचे सिद्ध झाले.

हे ही वाचा<< १५ वर्षं सुट्टीवर असताना पगारवाढ न मिळाल्याने कर्मचाऱ्याने कंपनीला कोर्टात खेचलं, निर्णय वाचून व्हाल थक्क

निष्कर्ष: व्हायरल फोटो ज्यामध्ये एक जोडपं प्री-वेडिंग फोटोशूट करत असल्याचा दावा केला जात आहे पण हे फोटो एआय निर्मित आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple kissing romance in dirty drainage pre wedding photoshoot how ai changed their faces why people are praising svs