असं म्हणतात की, “दोन व्यक्तींमध्ये खरे प्रेम असेल तर देवही त्यांना वेगळे करू शकत नाही.” या गोष्टी ऐकायला फिल्मी किंवा पुस्तकी वाटू शकतात. पण याची प्रचिती देणारी घटना नुकतीच इटलीमध्ये घडली. ही एक घटना पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. एकाच दिवशी वेगवेगळ्या विमानाने एक जोडपे प्रवास करत होते, दोघांच्या विमानाचा अपघात झाला. विशेष म्हणजे दोघेही अपघातामधून बचावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेली स्टार न्युज वेबसाइटनुसार, ३० वर्षाचा स्टेफानो पिरीली (Stefano Pirilli) आणि त्याची होणारी बायको एंटोनिएटा डेमोसा (Antonietta Demasi) (२२ वर्षाची) वेगवेगळ्या विमानाने प्रवास करत होते. विशेष गोष्ट म्हणजे दोघांच्या विमानाचा एका दिवशी अपघात झाला आहे. त्यानंतर दोघांची अवस्था एकसारखीच झाली होती पण त्यांच्या खऱ्या प्रेमामुळे त्यांनी आलेल्या संकटावर मात केली. सुदैवाने विमान अपघातामधून भावी नवरा-बायको दोघेही बचावले. एकीकडे स्टोफेनो याला फारशी दुखापत झाली नव्हती तर दुसरीकडे एंटीनिएटाला खूप दुखापत झाली होती.

दोघांच्या विमानाचा झाला अपघात
दोघा नवरा-बायोकाला अपघाताच्या ठिकाणांहून फायर फाइटर्सने वाचवले. दोघेही इटलीमध्ये टुरीन शहरात प्रवास करत होते. नवरा-बायको दोघेही आपल्या मित्रांसह दुपारी जेवणासाठी गेले होते. स्टेफानोने सांगितले की, एंटोनिएटा पहिल्यांदाच विमान प्रवास करत होती ज्यासाठी ती खूप उत्साही होती. दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. पण सर्व काही खराब झाले आणि त्याचे त्याला फार वाईट वाटते.

हेही वाचा – एम.एस. धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात रंगला सामना; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव वाचवला

दोघेही आपल्या मित्रांसोबत पार्टीला जात होते. त्यांचे विमान २ सीटर होते म्हणजेच अशा विमानात एकावेळी एकच पायलट आणि एकच प्रवासी बसू शकतात. हे विमान लहान असल्याने अपघातांची तीव्रता कमी होती. स्टेफानोने सांगितले की, “हवामान पाहून तो काळजीत पडला होता. धुके येऊ लागले आणि तापमान कमी होऊ लागल्याने त्यांची चिंता वाढली. त्याला काहीच दिसत नव्हते आणि तो एअरस्ट्रिपच्या १०० मीटर पुढे आला आणि मग अचानक अपघात झाला. कसातरी स्टेफानो ढिगाऱ्यातून बाहेर आला आणि पायलटलाही बाहेर काढलं. त्याने ताबडतोब आपत्कालीन सेवांना कॉल केला आणि नंतर तिच्या एंटोनिएटाला कॉल केला पण त्यांनी तो उचलला नाही. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले होते.

हेही वाचा – कुत्र्याच्या पिल्लांसाठी चिमुकल्याने केला भांगडा डान्स; गोंडस व्हिडीओ होतो व्हायरल, एकदा बघाच!

अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या होणाऱ्या पत्नीसह त्याने पायलटबद्दल त्याने काळजी व्यक्त केली. तो म्हणाला की,”त्याला फक्त त्याची होणारी पत्नी आणि दोन्ही पायलट सुरक्षित बघायचे आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple miraculously escapes death in two separate plane crashes on same day snk