Couple Openly Romance OYO Room Video : कल्पना करा, तुम्ही मेट्रो स्थानकावर ट्रेनची वाट पाहत उभे आहात आणि समोरच्या हॉटेलमधून तुम्हाला लाईव्ह रोमान्सचे दृश्य पाहायला मिळाले तर… तुम्हाला हे वाचून हसू येईल किंवा विचित्रदेखील वाटेल, पण असाच काहीसा प्रकार एका मेट्रो स्थानकावरील लोकांना पाहिला मिळाला, ज्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना हा प्रकार पाहून हसू आवरणं अवघड झालं आहे.

मेट्रो स्थानकावरून ओयो रुममधलं दिसलेलं ते दृश्य पाहून अनेकांनी हे मेट्रो स्थानक आता ‘मिनी मालदीव’ बनले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मेट्रो स्थानकावरून दिसले ओयो रूमचे दृश्य

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं ओयो रूममध्ये रोमान्स करत होते. यावेळी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा होता याचेही भान त्यांना नव्हते. या रूमच्या अगदी समोरच मेट्रो स्थानक आहे, ज्यामुळे मेट्रो स्थानकावर उभे असलेले लोकही ते दृश्य पाहून थक्क झाले. व्हिडीओत दिसतेय की, स्थानकावरून एक जण जोर-जोरात ओरडत सांगतोय की भावा, कृपया गेट बंद कर. यावेळी मेट्रो स्थानकावरून हे दृश्य पाहणारे लोकही जोरजोरात हसू लागतात आणि व्हिडीओ शूट करतात. यावेळी ओयो रूममधील तरुण धावत येतो आणि पटकन रूमचा दरवाजा बंद करतो. यावेळी मेट्रो स्थानकावरील काही लोक कपलचे “ओपन बॉन्डिंग” पाहून आश्चर्य व्यक्त करतायत.

तर अनेक जण सोशल मीडियावरील या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मिश्कीलपणे म्हणतायत की, भावा, आम्ही मेट्रोचे तिकीट बुक केले होते, पण मला हा काय बोनस मिळाला? हा व्हिडीओ @mahiiii._.17 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडीओला लाईकदेखील केले आहे.

अनेक जण त्याखाली भन्नाट भन्नाट कमेंट्सदेखील करतायत. एका युजरने लिहिले की, दरवाजा लावण्याची काय गरज आहे, आता हा व्हिडीओ लीक तर होणारच आहे, तर दुसऱ्याने लिहिले की, एक प्रदर्शन चालू आहे; तर तिसऱ्याने लिहिले की, भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता निघाला.