Couple Recreates Rimjhim Gire Saawan Scenes : तुमचं वय काय, तुमचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला हे महत्त्वाचं नसतं; पण तुम्ही आयुष्य कसं जगता, जोडीदारावर किती निखळ प्रेम करता हे महत्त्वाचं असतं. कारण- वय वाढलं तरी जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण आनंदानं जगता आला पाहिजे. सोबत स्वप्नं बघता आली पाहिजेत. कारण- जीवनातील सुखाचे काही क्षण यातच दडलेले असतात. पण, वेगानं बदलणाऱ्या या युगात आपण जुन्या आठवणींत रमतो हे पाहून काही जण आपल्याला मूर्खात काढतात. पण, एका वृद्ध जोडप्यानं लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला आवडणारा एक जुना काळ खऱ्याखुऱ्या आयुष्यात पुन्हा जगला आहे. हे पाहून अनेकांना आपल्या शाळेतील पहिल्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

या वृद्ध जोडप्यानं सदाबहार ‘रिम झिम गिरे सावन’ गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. अगदी हुबेहूब जुन्या गाण्यातील तीच ठिकाणं वापरून हे गाणं शूट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर करीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्यांचं कौतुक केलं आहे. रिमझिम गिरे सावन या मूळ गाण्यात ज्या पद्धतीनं नृत्यदिग्दर्शन करण्यात आलंय. अगदी तसंच नृत्यदिग्दर्शन रिक्रिएशनमध्ये करण्यात आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे त्या काळात मुंबईच्या ज्या ज्या लोकेशनवर हे गाणं शूट झालं, ती सर्व लोकेशन रिक्रिएशनमध्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे हे रिक्रिएशन पाहताना तुम्हाला जुन्या गाण्याची फ्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तो योग्य रीत्या व्हायरल होत आहे. एका वृद्ध जोडप्यानं ‘रिमझिम गिरे सावन’ हे लोकप्रिय गाणं चित्रपटात मुंबईतील ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आलं, त्याच ठिकाणी पुन्हा ते तयार केलं गेलं. मी त्यांची स्तुती करतो. यातून ते आपल्याला सांगत आहेत की, जर तुम्ही तुमची कल्पना योग्य प्रकारे मांडली, तर तुम्ही आयुष्य तुम्हाला हवं तसं सुंदर बनवू शकता!

Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
Fake blood donation by bjp leader
भाजपा नेत्याची चमकोगिरी; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केलं बोगस रक्तदान, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाले…
Vicky kaushal tauba tauba song video the old age home old ladies danced on the song tauba tauba vicky kaushal
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…

शैलेंद्र इनामदार आणि त्यांची पत्नी वंदना इनामदार या रिल आणि खऱ्या आयुष्यातील जोडप्यानं रिमझिम गिरे सावन या गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. तर, अनूप आणि अंकिता रिंगणगावकर या जोडप्यानं हे गाणं चित्रित केलं आहे. यात त्यांचा मुलगा अपूर्व यानं चित्रीकरण एडिट केलं आहे. गाण्याचं हे रिक्रिएशन सोशल मीडिया युजर्सना खूप पसंत पडलं आहे; ज्यावर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांनी अभिनय केला होता; तर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी ते गायलं होतं. बासू चॅटर्जी दिग्दर्शित मंझिल या चित्रपटात हे गाणं दाखवण्यात आलं होतं.