Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडालेली असतात की, आपण कुठे आहोत, याचं भानदेखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईतील अंधेरी स्टेशनवर भरदिवसा कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडीओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडीओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कपल रेल्वे स्टेशनवर अश्लील चाळे करीत आहे. त्यांच्या या लज्जास्पद कृतीचा व्हिडीओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं दिसत आहे. एक कपल एकमेकांना अतिशय जवळ घेऊन किस करीत आहे. हा व्हिडीओ अंधेरी स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनच्या एका कडेला उभं राहून कपल किस करीत आहे. तर, स्टेशनवरून येणारे-जाणारे प्रवासी त्यांच्याकडे पाहत आहेत आणि दुर्लक्ष करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbai.hai.bhai_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करीत आहेत. लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी यात आक्षेपार्ह काहीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.