Delhi metro shocking video: असं म्हणतात, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं. पण काही लोकं या म्हणीला फारच गांभिर्यानं घेतात. अन् नको त्या गोष्टी करू लागतात. अशी शेकडो कपल तुम्ही आजवर समुद्रकिनारी, हॉटेल्समध्ये, सिनेमागृहात आणि हल्ली तर मेट्रोमध्ये सुद्धा पाहिली असतील. रोमान्स करताना आसपास असलेली लोकं त्यांना पाहताहेत याचं भान देखील या प्रेमी युगलांना नसतं.अशाच एका तरुणाचा संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते ती तिथे होणाऱ्या महिलांच्या भांडणामुळे, जोडप्यांच्या इंटिमेट सीनमुळे; तर काही प्रवाशांच्या विचित्र वागणुकीच्या व्हिडीओंमुळे. दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये मेट्रोतील एका जोडप्याची सर्वांसमोर रोमान्स करतानाची दृश्ये कैद झाली आहेत. दोघे एकमेकांना मिठी मारताना आणि खूप जवळ येताना दिसत असून, त्यामुळे इतर प्रवासी अस्वस्थ झाले आहेत.तरीही हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला सोडायला तयार नाहीये. काहींनी हे वर्तन सार्वजनिक ठिकाणी अयोग्य ठरवले, तर काहींनी खाजगी क्षण इतक्या उघडपणे शेअर करण्यावर नाराजी व्यक्त केली. दिल्ली मेट्रो प्रशासनाने वारंवार इशारा देऊनही कपलचे अश्लील चाळे थांबत नाही आहे.दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ viralinsects नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया देत आहे. “हल्लीच्या तरुण पिढीला काहीच लाज शिल्लक राहिलेली नाही” तर आणखी एकानं हे सगळं गंभीर असल्याचं म्हंटलंय.

Story img Loader