बस, रेल्वे किंवा मेट्रो प्रवास करताना अनेकदा खास काही कलाकारी लोक दृष्टीस पडतात. कोण जोरजोरात खोकतय, कोणी गाणी गुणगुणतय, तर कधी कोण जागेसाठी भांडतय; तर कधी कोणी कंडक्टर टीसीबरोबर वाद घालतायत. तुम्हीही अनेकदा अशा गोष्टी अनुभवल्या असतील. प्रवासादरम्यान काहीवेळा लोक असं काही विचित्र कृत्य करताना दिसतात, जे पाहताना दुसऱ्यांना लाज वाटते. असाच काहीसा प्रकार एका विमान प्रवासादरम्यान समोर आला आहे. भरविमानात एक कपल असे काही विचित्र कृत्य करत होते, ज्यामुळे इतर प्रवाशांना लाजेने आपली मान खाली घालून बसावे लागले. दरम्यान, या घटनेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विमानात एकमेकांच्या शेजारी बसलेलं कपल सीटवर असे काही कृत्य करू लागले की, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. हे दोघं आपल्या आजूबाजूला इतर प्रवासी आहेत हे जणू विसरून गेले होते. आपण बेडरूममध्ये असल्यासारखे त्यांचे वर्तन होते, त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल

व्हायरल फोटोत तुम्ही पाहू शकता, एक कपल दोन्ही सीटवर एकमेकांना मिठी मारून झोपलं आहे. एकमेकांच्या अंगावर पाय टाकले आहेत. दोघांचे अशाप्रकारे झोपून अश्लील चाळे सुरू आहेत. विमानातील प्रवाशांच्या माहितीनुसार, पूर्ण चार तासांच्या विमान प्रवासात कपलचे असे चाळे सुरू होते. विमानातल्या सहप्रवाशांना ते पाहून अवघडल्यासारखं होत होतं, यामुळे कपलच्या या कृत्याबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple romance in flight couple sleep on seat together passengers angry post on couples on flight goes photo viral sjr