Couple romance in running car: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं असं अनेकांना वाटत असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल चक्क धावत्या कारमध्ये लज्जास्पद कृत्य करताना दिसत आहेत.

हेही वाचा… आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल

कपलचे धावत्या कारमध्ये अश्लील चाळे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की, या कपलने मर्यादा ओलांडत धावत्या कारमध्ये लाजिरवाणं कृत्य केलं आहे. नागपूरात धरमपेठ येथे तरुण कार चालवताना दिसत आहे. ड्रायव्हरच्या सीटवर असलेल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर तरुणी बसली आहे. कार चालवता चालवता दोघं किस करताना दिसतायत. यामुळे भयंकर अपघातही होऊ शकतो याची जाणीव त्यांना दिसत नाहीय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vidarbh.kida या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत ड्रायविंग सीटवर बसून अश्लील चाळे” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल २.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… कोल्हापूरात टॅलेंटची कमी नाही! शालेय विद्यार्थ्याने केली एसटी महामंडळाची अनाउन्समेंट; आवाज ऐकून बस डेपोमध्ये आल्यासारखं वाटेल, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सीट बेल्ट कसा लावला असेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तिला मोशन सिकनेस असेल म्हणून घाबरून बसली असेल” तर तिसऱ्याने “तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे” अशी कमेंट केली. तर “यांनी लाज सोडलीय”, “असं कराल तर अपघात होईल” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple romance in running car girlfriend boyfriend viral video of kissing in nagpur dvr