Couple Viral Video: ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. यादरम्यान, नेहमीच काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ट्रेनमध्ये चोरीमारी, स्टंट याबरोबरच कपल्सचेदेखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. पण आजकाल ट्रेनमध्ये आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी अगदी जगाची चिंता न करता काही कपल्स अक्षरश: मर्यादा ओलांडतात. कुठेही अश्लील कृत्य करू लागतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल ट्रेनमधील टॉयलेटमधून बाहेर येताना दिसतंय. अश्लील कृत्य करताना दिसतायत.
कपलचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेनच्या टॉयलेटमधून एक कपल बाहेर पडताना दिसतंय. सुरूवातीला तरुण टॉयलेटमधून बाहेर पडतो मग काही वेळेनंतर एक महिला टॉयलेटचं दार उघडायला जाते तर आत तरुणी असते. आजूबाजूला बघत तीदेखील टॉयलेटच्या बाहेर पडते. यावरून कळतंय की दोघंही त्या टॉयलेटमध्ये एकत्र होते. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचं वर्तन केल्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @rewasatnanews.ai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “ट्रेनचं टॉयलेट बनला ओयो! तरुण आणि तरुणीला पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले ” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १०.४ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे एडिट केल्यासारखं वाटतंय” तर तिसऱ्याने “घोर, कलयुग, आणि काही नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अरेजरातरी लाज बाळगा”