Couple Romance On Scooty : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात जीव धोक्यात घालून जोडपी कधी रोमान्स करताना, तर कधी जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. यात दिल्लीतील मेट्रोमधील जोडप्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रस्त्यावर स्कूटीने जाणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात प्रेयसी-प्रियकर भररस्त्यात स्कूटीवर अगदी कारमध्ये बसल्याचा फील घेत रोमान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दिल्लीच्या कोणत्या भागातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तो पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे काही यूजर्स अशा काही कमेंट्स करत आहेत, ज्या वाचण्यासारख्या आहेत. हा व्हिडीओ पाहून, ‘भाऊ ये इश्क नही, रिक्स है,’ असे आपसूकच तुमच्याही तोंडून आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे स्कूटीने जात होते. या वेळी एक तरुण स्कूटी चालवत असल्याचे दिसत आहे. तर तरुणी त्याच्या मागे बसली आहे. या वेळी चालत्या स्कूटीवर काही वेळा दोघे अशा पद्धतीने बसत होते जे पाहून तुम्हालाही काही वेळ समजणार नाही ते नक्की स्कूटीवर बसले आहेत की कारमध्ये…
पठ्ठ्याने कारवरील डेंट काढण्यासाठी केला अनोखा जुगाड; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
स्कूटीवर रोमान्स करणाऱ्या जोडप्याचा हा व्हिडीओ शालू (@shalukashyap28) इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिल्लीच्या रस्त्यावर प्रेम आणि धोका…’ तर व्हिडीओवर लिहिले आहे की, ‘दिल्लीवाले हे कोणते प्रेम सुरू आहे?’ या व्हिडीओला आत्तापर्यंत ४३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर १ लाख ७३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जोडप्याचा स्कूटीवर बसण्याचा हा प्रकार पाहून यूजर्स व्हिडीओखाली कमेंट्स करण्यापासून स्वत: रोखू शकले नाही.
अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या मनातील अनेक भन्नाट भन्नाट गोष्टी लिहिल्या आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘जेव्हा यमराजजी आणि दिल्ली पोलीस रजेवर असतात, तेव्हा अशा प्रकारचे प्रेम बहरून येते.’ तर दुसर्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘आपला समाज दोन लोकांचे सुख पाहू शकत नाही का?’ तर तिसऱ्या एका यूजरने व्हिडीओचा पुरेपूर आनंद घेत लिहिले आहे की, ‘हे खरे प्रेम आहे.’ इतकेच नाही एकाने भली मोठी कमेंट करत म्हटले आहे की, ‘भाऊ, स्कूटी चालव… नाही तर पडून डोके फुटेल.. यानंतर तुला काही आठवणार नाही आणि प्रेमही निघून जाईल.’