सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ हे मजेदार गोष्टींचे असतात. हे पाहण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. अनेक वेळा पालकांकडून या प्रेमाचा स्विकार होतो आणि मुलांचं लग्न थाटामाट्यात लावून दिलं जातं. पण काही वेळा पालक अजिबात तयार होत नाहीत. अशावेळी अनेक जण पालकांमुळे आपलं प्रेम तसंच अर्धवट सोडतात तर काहीजण दुसरा मार्ग निवडतात. तो म्हणजे पालकांच्या परवानगीशिवाय पळून जाऊन लग्न करणं. दरम्यान याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणीला घरातून पळून घेऊन जाण्यासाठी आला असतो. ती तरुणी बॅग वगैरे घेऊन पळत त्या तरुणाकडे येते. तो तरुण तिची बाइकवर वाट पाहत असतो. पण ऐन वेळी त्याची बाइक काही केल्या सुरु होतं नाही. त्या तरुणीचे घरचे काठी घेऊन तिच्या पाठलाग करत असतात. आता काय करायचं बाइक सुरु तर होतं नाही आहे.

अशातच त्या दोघांचं लक्ष तिथे असलेल्या ड्रमवर गेलं. प्रसंग बघता तो तरुण तरुणीला ड्रममध्ये लपवतो. आता तो परत बाइक सुरु करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तरुणीचे घरचे काठ्या घेऊन त्याला मारायला येतात. तो बाइक तिथे सोडून पळ काढतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – हरयाणामध्ये नशेत तरुणानं ६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, सीसीटीव्ही VIDEO पाहून उडेल थरकाप

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांही हसू आवरनं कठीण झालंय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले अशून नेटकरी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया यावर देत आहेत.