रस्त्यावर प्रवास करताना अनेकवेळा अपघात झालेले प्रत्यक्षात किंवा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेल. अशावेळी अपघातग्रस्त व्यक्तींच्या मदतीला तिथे उपस्थित असणारे सर्वजण धावून जातात. पोलीस, रुग्णवाहिका यांना तात्काळ संपर्क साधून जखमी व्यक्तींची मदत केली जाते. दुर्दैवाने प्राण्यांच्या मदतीला असे कोणीही पुढे येत नाही. जर कधी प्राण्यांचा अपघात झाला, त्यांना दुखापत झाली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या व्यक्तीमुळे त्यांना दुखापत झाली आहे, ते देखील या गोष्टीची दखल घेत नाहीत. असे बऱ्याच वेळा घडते, पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एका जोडप्याने मानवतेची शिकवण दिली आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा जखमी अवस्थेत रस्त्याच्या मध्ये झोपलेला दिसत आहे. तो कुत्रा मेला आहे, असे समजुन तिथून जाणारे सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करत तर काहीजण त्याच्यावरून गाडी चालवत तिथून जात आहेत. या कुत्र्याला मदत करण्यासाठी एक जोडपं त्याच्याजवळ जाऊन पाहते, तेव्हा त्यांना समजते की तो जिवंत आहे. मग हे जोडपं तात्काळ त्याला दवाखाण्यात घेऊन जातात. त्याची स्थिती गंभीर असल्याचे समजते, तेथील उपचारानंतर या कुत्र्याचा जीव वाचतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: हत्तीने रस्ता कसा ओलांडायचा ते पिल्लाला कसे शिकवले पाहा; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
व्हायरल व्हिडीओ:
मानवतेची शिकवण देणाऱ्या या जोडप्याच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असुन, लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.