कोणतंही संकट समोर आलं तर कोणताही व्यक्तीच्या मनात भिती निर्माण होते. विशेषत: नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीचा सामना करताना कोणत्याही व्यक्तीला भिती वाटणे सहाजिक आहे. अशा परिस्थितीत लोक भितीमुळे अस्वस्थ होतात, आरडा-ओरडा करतात पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे पुराच्या पाण्यात अडकलेले असूनही निवांत बसलेले दिसत आहे. जोडप्याची कार नदीच्या मधोमध अडकलेली दिसत आहे आणि त्या कारच्या छतावर आरामात गप्पा मारताना दिसत आहे जे पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू असताना, रविवारी साबरकांठा जिल्ह्यात नदीत वाहून गेल्याने एक माणूस आणि त्याची पत्नी त्यांच्या पाण्यात बुडालेल्या कारवर दोन तास अडकले होते.. इंटरनेटवर दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेले असूनही हे जोडपे कारच्या छतावर निवांत गप्पा मारत बसले होते हे पाहून लोक थक्क झाले आहे.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

व्हायरल क्लिपमध्ये, पुरुष आपल्या मोबाइल फोनवरून कॉल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर महिला पाण्यात बुडलेल्या कारमध्ये शांतपणे बसलेली आहे, फक्त छप्पर दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे बचाव पथक घटनास्थळी पोहोचते आणि जोडप्याला वाचवते.

द इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, करोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने या जोडप्याची कार १.५ किमी दूर वाहून गेली.

या अहवालात म्हटले आहे की,”शक्तिशाली प्रवाहामुळे सुरुवातीचे बचावाचे प्रयत्न अयशस्वी झाले. अग्निशमन अधिकारी कमल पटेल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, “आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो तेव्हा बोटीसह बचाव पथक जात होते.”

व्हिडिओ शेअर करताना एका X हँडलने लिहिले की, “ते खूप निवांत बसले आहेत. साबरकांठा, गुजरात येथून बचाव कार्य.

हेही वाचा – पुलावरून जात होता ट्रक अन् पुढच्याक्षणी नदीत कोसळला…. धडकी भरवणारा Video Viral

व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

व्हिडिओवर एकाने कमेंट करत म्हटले की, “हे लोक इतके निवांत कसे आहेत !!!” दुसऱ्याने लिहिले की, “ काका काकुंना सलाम.”

हेही वाचा – लेकीच्या डोळ्यांसमोर आईच्या अंगावर पडली रिक्षा, शाळकरी मुलीने दाखवलं धाडस! थरारक अपघाताचा Video Viral

“आम्ही नदी ओलांडत असताना पाण्याची पातळी अचानक वाढले आणि प्रवाह इतका जोरदार झाला की, आमची कार सुमारे १.५ किमी वाहून गेली,” असे सुरेश मिस्त्री, पुरात अडकलेल्या व्यक्तीने इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले.

Story img Loader