एका जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी मागवलेल्या अन्नाचे पैसे परत मिळवण्यासाठी जे कृत्य केले, त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील जोडप्यानं पैसे परत मिळवण्यासाठी जे केले आहे त्यावर नेटकरी फारच नाराज झाले असून, सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी अशा गोष्टींपासून सावधानता बाळगली पाहिजे, हे देखील स्पष्ट होते. हा व्हायरल होणारा व्हिडीओ म्हणजे एका रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये एक बाई आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या अर्धवट खाल्लेल्या ताटामध्ये आपले केस तोडून टाकताना दिसत आहे. असे केल्याने आपण मागवलेल्या पदार्थात केस आहे हे दाखवून, रेस्टॉरंटकडे त्यांनी मागवलेल्या पदार्थांचे पैसे परत घेण्याचा तिचा हेतू होता असे स्प्ष्ट दिसते. पण, व्हिडीओमधील बाई असे काही करत आहे हे लक्षात येताच, रेस्टॉरंटमधील लोकांनी त्यावर भराभर हालचाल करून, त्या जोडप्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजचा सरळ व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.
जोडप्याने पैसे परत मिळावे म्हणून चक्क अन्नात आपलेच केस घातले! रेस्टॉरंटने शेअर केलेला हा व्हायरल Video पाहा.
व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, एका महिलेने आपलेच केस तोडून त्यांनी मागवलेल्या जेवणात टाकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर रेस्टॉरंटने कसं उत्तर दिले आहे ते पाहा.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-11-2023 at 19:52 IST
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending VideoफूडFoodव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Video
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple tries to take refund from restaurant puts their own hair in food restaurant video goes viral dha