Couple Viral Video: प्रेम केल्यानंतर माणसाला कसलंच भान नसतं असं म्हणतात. प्रेमात माणूस कुठल्याही थराला जातो आणि काहीही करतो. प्रेमात पडलेले असे कपल्स अनेकदा आपल्याला रस्त्यांवर. गार्डनमध्ये किंवा जिथे माणसं येत जात नसतील अशा ठिकाणी भेटताना दिसतात. अनेकदा अशा कपल्सचे व्हिडीओ त्यांच्या नकळत सोशल मीडियावर व्हायरल केले जातात.
पण अशात काही कपल्स असेही असतात जे आपली मर्यादा ओलांडतात. आजूबाजूचं भान न ठेवता कुठेही अश्लील प्रकार सुरू करतात. आणि मग असे कपल्स पकडले गेले की, पळ काढतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलंय या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ या…
गर्लफ्रेंडचा व्हायरल व्हिडीओ (Girlfriend Jumped From Terrace)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक कपल टेरेसवर गुपचूप भेटताना दिसतंय. एकमेकांना भेटल्यानंतर यातील तरुणी टेरेस वरून उडी मारून बिल्डिंगच्या सर्वात वरच्या माळ्यावर उतरते. मग पुन्हा त्या माळ्यावरून खालच्या माळ्यावर उडी मारते. तसंच तरुणदेखील तिच्या मागोमाग खाली उतरणार असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. हा सगळा स्टंट ते पकडू जाऊ नयेत यासाठी केलेला दिसतोय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @wildboka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “पळणारी गर्लफ्रेंड लेटेस्ट एडिशन” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “थोडीशी जरी चूक झाली असती तर थेट वर गेली असती” तर दुसऱ्याने “एवढी रिस्क कोण घेतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “काहीही झालं तरी मुलीची फिटनेस लेव्हल अगदी मस्त आहे.”