Viral Video: प्रेम ही एक गोड भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडते, ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते; तुम्ही आतापर्यंत लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट यांच्या अजरामर प्रेमकथा ऐकल्या असतील. काही प्रेमी आपल्या जोडीदारासाठी अगदी स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार असतात, तर काही जण आपल्या प्रेमीसाठी आपलं आयुष्य पणाला लावतात. प्रेमाचे असे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले असतील. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अशाच एक प्रेमी जोडप्याची पहिली भेट दाखवणारा सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

आपल्या आवडीच्या व्यक्तीची पहिली भेट प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप खास क्षण असतो. लोक हा दिवस नेहमी आठवणीत राहावा यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात. हल्ली सोशल मीडियामुळे हे सुंदर क्षण व्हिडीओमध्ये कैद केले जातात, ज्याला लोकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हाच सुंदर क्षण पाहायला मिळत आहे, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी एका कॅफेमध्ये बसली असून यावेळी तिच्या मागून अचानक तिचा प्रियकर येतो आणि तिच्या समोर गुलाबाचा गुच्छ ठेवतो. यावेळी तरुणी प्रियकराकडे पाहते आणि आश्चर्यचकित होते आणि त्यानंतर एका खांबामागे लपून लाजते. त्यावेळी प्रियकर तिला समोर यायला सांगतो. त्यानंतर लाजत लाजत ती त्याच्या बाजूला येऊन बसते. ही या दोघांची पहिली भेट असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @risva_riz या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत १९ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

यावर एका युजरने लिहिलंय की, “खूप सुंदर व्हिडीओ”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “असा सुंदर क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवा”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “मला खूप भरून आलं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खरं प्रेम आहे, खूप सुंदर.”

Story img Loader