Couple Vulgar Video: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. पण आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करणं तर सोडाच पण अश्लील चाळे करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत.

अनेकदा दिल्ली मेट्रो किंवा मुंबई रेल्वे स्थानकावर कपल्सच्या अश्लील वर्तनाचे व्हिडीओ अधूनमधून सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एक बेंगळुरूचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

त्याने तिच्याबरोबर केलं अश्लील कृत्य (Girlfriend Boyfriend Video)

कर्नाटकातील बेंगळुरूमधील एका मेट्रो स्टेशनवर एक कपल अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला. ही घटना मदवारा मेट्रो स्टेशनवर घडल्याचे वृत्त आहे.

एक मिनिट ३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीच्या टी-शर्टमध्ये हात घालत असल्याचे दिसून येत होते, जी त्याची प्रेयसी असल्याचे दिसून येतेय. मेट्रो ट्रेनची वाट पाहत असताना त्यांनी हे अश्लील कृत्य केले. या कपलचे नेमके वय माहित नाही.

हा व्हिडिओ सर्वप्रथम @karnatakaportf या एक्स अकाउंटवर ‘बेंगळुरू मेट्रो देखील दिल्ली मेट्रो कल्चरकडे वाटचाल करत आहे का?’ या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला होता. लवकरच सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता वाढली. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही दिल्ली मेट्रोमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या.

जेव्हा कपलने अश्लील कृत्य केले तेव्हा स्टेशनवर इतर लोकही उपस्थित होते. काही अंतरावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला.

युजर्सच्या प्रतिक्रिया

या घटनेमुळे ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे. नेटिझन्स या कपलला अश्लील वर्तनाबद्दल फटकारत आहेत. काहींनी तर हे कपल बेंगळुरूचे नसल्याचे म्हटले आहे, तथापि, काही नेटिझन्स व्हिडिओमधील मुलगी आणि मुलगा उत्तर भारतातील असल्याचा निराधार दावा करतात.

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी फक्त बंगळुरूमध्येच का घडतात, हैदराबाद, चेन्नई, कोची सारख्या इतर महानगरांमध्ये का घडत नाहीत,” तर दुसऱ्याने “थोडी लाज बाळगा यार! थोडी सभ्यता बाळगा! मुलगी कदाचित अल्पवयीन असेल.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला “निश्चितच हे स्थलांतरित लोक आहेत, स्थानिक लोक नाही.उत्तरेकडील काही अशिक्षित स्थलांतरित लोक दक्षिणेची संस्कृती खराब करत आहेत यात आश्चर्य नाही. अगदी निर्लज्ज!”

दरम्यान, मेट्रो अधिकाऱ्यांच्या बेंगळुरू पोलिसांनी अद्याप या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.