ऑफिसमधून सुट्टी घेणे ही देखील एक कला आहे. काही लोक खरं कारण सांगून सुट्या घेतात तर काही लोक काहीही विचित्र आणि खोटी कारणं सांगून सुट्या घेतात. सुट्या घेण्यासाठी काहीही कारणं दिल्याच्या अनेक मजेदार घटना आपण या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहील्या आहेत. सध्या सुट्यांबाबतची अशीच एक घटना ब्रिटनच्या वेल्समधून समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यामध्ये वारंवार आजारी असल्याचे कारण सांगत सुट्टी घेतल्याने एका २५ वर्षीय महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मात्र आता तिला कामावरुन कमी करणाऱ्या बॉसला तिला 3 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. एक्सप्रेस डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण वेल्स, यूके येथील आहे. जिथे २५ वर्षीय सेलिन थोरली ही महिला ‘अ‍ॅक्युट बार्बर्स’ नावाच्या कंपनीत काम करत होती. Acute Barbers ही एक सलून शाखा आहेत.

हेही पाहा- भलता स्टंट करण्याच्या नादात तरुणी तोंडावर आपटली, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

एक्यूट बार्बर्स या शाखेची प्रमुख क्रिस डोनेली या महिलेने सेलीन थोरली हीला इशारा दिला की, सोमवारी अचानक सुट्टी मागू नको. खरं तर वीकेंडला सोलीन मित्रांसोबत हॅलोविन पार्टी करणार होती, त्यामुळे शाखा व्यवस्थापकाने तिला सोमवारी सुट्टी न घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, जेव्हा सोमवार उजाडला तेव्हा सेलिन कामावर गेली नाहीच आणि आपल्या बॉसला खूप आजारी असल्याचा मेसेज केला. या मेसेजमध्ये आपण घरातून बाहेर पडण्याच्या स्थितीत नसल्याच कारणही तिने दिलं.

शिवाय अचानक रजा घेतल्याबद्दल सेलीनने मेसेजमध्ये आपल्या बॉसची माफीही मागितली होती. या मेसेजवर ख्रिस डोनेलीने सेलिन आजारपणाचे नाटक करत असल्याने तिला नोकरीवरून काढण्यात आल्याचा रिप्लाई दिला. तर डोनेलीने असा युक्तीवाद केला की, सेलीन वीकेंडला चांगली होती, मग ती सोमवारी अचानक आजारी कशी पडू शकते?

हेही वाचा- कोंबड्याच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू, कोर्टाच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

दरम्यान, हा खटला कोर्टात गेल्यावर ख्रिस डोनेलीने कोर्टात सांगितले की, सेलिन ही नेहमी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त सुट्ट्या घेते. वर्षातील १७ दिवस ती सोमवार आणि मंगळवारी कामावर आलेली नाही. तर सेलिनने सांगितले की, ती ‘एंडोमेट्रिओसिस’ नावाच्या आजाराने त्रस्त आहे, ज्यामुळे ती नेहमीच शारीरिकदृष्ट्या कमकुवत राहते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने डोनेलीला ३ लाख ४४ हजार २०४ रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाने सांगितले की कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करण्याआधी तुम्ही आवश्यक अटी पाळल्या नाहीत, त्यामुळे तुम्हाला भरपाई द्यावी लागणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court slaps boss with 3 lakh fine for suddenly firing employee because you will be surprised to read it jap
Show comments