COVID 19 Vaccine Banned By Iceland: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेला एक दावा आढळून आला आहे. यानुसार, एका देशाने कोविड -19 लसीकरणांवर बंदी घातली आहे असे सांगितले जातेय. एकीकडे भारतात दिवसागणिक कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अशाप्रकारचा व्हायरल दावा हा भुवया उंचावणारा आहे. नेमक्या कोणत्या देशाच्या नावाने हा दावा व्हायरल होत आहे आणि यात कितपत तथ्य आहे हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे वायरल?

ट्विटर यूजर Nick Morris ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

असे अनेक X वापरकर्ते आहेत जे या पोस्ट्ससह ब्लॉग लिंक देखील शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमचा तपास व्हायरल दाव्यासह दिल्या गेलेल्या लिंकच्या तपासासह केला.

https://www.thaimbc.com/2023/11/25/iceland-bans-covid-shots-amid-soaring-sudden-deaths/

आम्ही TrustServista हा टूल वापरून या लिंक बद्दल ‘कन्टेन्ट क्वालिटी रिपोर्ट’ मिळवला. त्या रिपोर्ट मध्ये आम्हाला कळले, या लेखाचा कोणीही लेखक नाही , लेखाचा प्रकाशकही व्हेरीफाईड नाही. आम्ही दुसऱ्या लिंक वर देखील ‘TrustServista’ च वापर करून रिपोर्ट काढला.

Iceland Bans Covid Shots amid Soaring Sudden Deaths

इथे देखील कन्टेन्ट क्वालिटी रिपोर्ट मध्ये आम्हाला कळले कि प्रकाशक व्हेरीफाईड नव्हता. पण आम्हाला या रिपोर्ट मधून या लेखाचे मूळ सापडले. यावरून आम्हाला Sasha Latypova यांनी लिहिलेला एक लेख सापडला.

https://sashalatypova.substack.com/p/photo-report-from-sweden-and-iceland

लेख दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता आणि स्वीडिश संसदेत सादरीकरणादरम्यान या लेखात एका लाईव्ह स्ट्रीमच्या रेकॉर्डिंगची लिंक देखील सापडली.

https://sashalatypova.substack.com/p/livestream-recording-from-the-presentations

लाइव्हस्ट्रीम ही संसद भवनातील एका निवडून आलेल्या अधिकाऱ्याने आयोजित केलेली बैठक होती. या सादरीकरणांमध्ये,

१) एल्सा विडिंग, स्वीडनच्या खासदार व मायकेल पामर, एमडी, पीएचडी ‘एमआरएनए लसींच्या विषारीपणाची यंत्रणा’ या विषयावर बोलत होते.
२) साशा लॅटीपोवा ‘जागतिक लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्यसेवा बळकट करण्याबाबत’ बोलत आहेत.
३) पियरे कोरी, एमडी ‘आयव्हरमेक्टिनवरील युद्ध’ या विषयावर बोलत आहेत,
४) फिलिप क्रुस ‘डब्ल्यूएचओ इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स अँड पॅन्डेमिक ट्रीटी’ या विषयावर बोलत आहेत
५) रेनेट होलसीझेन, डब्ल्यूएचओ आणि युरोपियन कमिशन बाबत माहिती देत आहेत.
६) अँड्र्यू ब्रिजेन, एमपी, यूके ‘साथीच्या रोगाचा अनुभव’ या विषयावर बोलत आहेत.

मात्र या लाइव्हस्ट्रीममध्ये त्यांनी आइसलँडमधील कोविड लसींवरील बंदीबद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही.

त्यानंतर आइसलँडमधील लस बंदीची बातमी कोणत्या विश्वसनीय वृत्त स्रोताने दिली असल्याचे आम्ही ऑनलाइन शोधले. असा उल्लेख करणारे कोणतेही वृत्त आम्हाला आढळले नाही. पण, आम्हाला ९ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रकाशित झालेली WION वरील एक बातमी सापडली ज्यामध्ये असे म्हटले आहे की आईसलँडने हृदयाजवळ छातीत जळजळीची प्रकरणे पाहून Moderna च्या लसीचा वापर निलंबित केला आहे.

https://www.wionews.com/world/iceland-suspends-use-of-modernas-covid-vaccine-due-to-heart-inflammation-fears-419324

अहवालात असेही नमूद केले आहे: “फायझर लसीचा पुरवठा पुरेसा असल्याने, आइसलँडमध्ये मॉडर्ना लस न वापरण्याचा निर्णय घेतला आहे,” आरोग्य संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या निवेदनातही याची पुष्टी होते.

दरम्यान अधिक भक्कम स्रोतांसाठी आम्ही आइसलँडच्या आरोग्य मंत्रालयालाही यासंबंधी ईमेल पाठवला. त्यांनी उत्तरात आम्हाला सांगितले, आइसलँडने कोविड लसींवर बंदी घातली नाही. कोविड-19 साठी लसीकरण सुरू आहे. मुख्य एपिडेमियोलॉजिस्ट शिफारस करतात की खालील जोखीम गटांना COVID-19 लसीकरणासाठी प्राधान्य मिळावे

१) ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्ती.
२) जुनाट हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत रोग, लठ्ठपणा, मधुमेह
३) औषध किंवा रोगामुळे होणारी इम्युनोसप्रेसिव्ह रोग असलेले नागरिक.
४) गर्भवती महिला.
५) वर सूचीबद्ध केलेल्या जोखीम गटातील व्यक्तींची काळजी घेणारे आरोग्यसेवा कर्मचारी

प्राधान्य गटांना ही लस मोफत दिली जाते.

वरील माहिती आइसलँडच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहिती प्रमुख मार्गरेट एर्लेंड्सडोटीर यांनी दिली.

हे ही वाचा<< मला सर्दी, ताप आहे की Covid JN.1, फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणे, उपचार

निष्कर्ष: आइसलँडने कोविड लसींवर बंदी घातली नाही. कोविड-19 साठी लसीकरण सुरू आहे. व्हायरल पोस्ट आणि लेख खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 vaccine banned by country informs in viral post while jn1 patients increasing in world is the post real or fake check svs