अंकिता देशकर
Cows Died By COVID 19 Vaccine Video: लाईटहाऊस जर्नालिज्म ला एक दावा मोठया प्रमाणात व्हायरल होत असल्याचे जाणवले. या व्हिडिओ मध्ये गायी मेलेल्या किंवा मरणासन्न अवस्थेत दिसल्या. असा दावा करण्यात येत आहे की इटलीच्या सरकारने त्यांना कोविड १९ प्रतिबंधक लस दिल्यानंतर या गायींचा मृत्यू झाला.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Project TABS ने आपल्या प्रोफाइल वर हा दावा शेअर केला.
बाकी यूजर्स देखील हाच दावा करत आहेत.
तपास:
आम्ही इन्व्हिड टूल मध्ये व्हिडिओ अपलोड केला, या द्वारे आम्हाला काही किफ्रेम्स मिळाल्या आणि या किफ्रेम्स ला आम्ही इंटरनेट वर शोधले.
आम्हाला अरेबिक भाषेत एक आर्टिकल दहा महिन्याआधी अपलोड केल्याचे सापडले. या आर्टिकल मध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपचा समावेश होता. लेखाचा अनुवाद केल्यास आम्हाला कळले की एका व्हिडिओ क्लिपमध्ये इटलीमध्ये शेकडो गायींचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. इटलीत ७० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे.
आम्हाला हि पोस्ट फेसबुक पेज Akhbar Al Aan, अशा एका मीडिया चॅनेलवर सुद्धा आढळली
त्यानंतर आम्ही काही कीवर्ड वापरून इंटरनेटवर शोधले आणि घटनेबद्दलच्या काही बातम्या तपासल्या. आम्हाला एक आर्टिकल ansa.it वर सापडले.
ज्वारीमुळे ५० गायींना विषबाधा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आम्हाला एक आर्टिकल The Straits Times वर देखील सापडले. रिपोर्ट मध्ये म्हटले होते: वायव्य इटलीतील ट्यूरिनजवळ, सोमारिवा डेल बॉस्को येथे शेतातील पिडमॉन्टीज गुरेढोरे, ६ ऑगस्ट रोजी प्रुसिक ऍसिड विषबाधा झाल्याने या गुरांचा अचानक मृत्यू झाला. स्थानिक IZS पशु कल्याण संस्थेच्या म्हणण्यानुसार, हे ऍसिड धुरिनपासून येते, जे नैसर्गिकरित्या ज्वारीच्या रोपांमध्ये असते. हे आर्टिकल १९ ऑगस्ट २०२२ चे आहे.
इटलीने गायींना Covid-19 ची लस दिली असे सांगणारी कुठलीही बातमी आम्हाला सापडली नाही.
निष्कर्ष: कोविड-19 लसीमुळे गायी मरण पावल्या असे सांगणारा व्हिडिओ खोटा आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये प्रुसिक ऍसिड विषबाधा झाल्याने गायींचा इटली मध्ये मृत्यू झाला हा त्या वेळेचा व्हिडिओ आहे.