Coronavirus In Maharashtra: चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असून यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. कमी प्रमाणात झालेलं लसीकरण तसंच प्रतिकारशक्तीचा अभाव यामुळे पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. अशात जर चीनने ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यास १० ते २० लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असा अहवाल लंडनमधील Airfinity ने जारी केला आहे. चीनमध्ये Sinovac आणि Sinopharm या लसी देण्यात आल्या होत्या ज्या संसर्ग रोखण्यात कार्यक्षम नाहीत,” असं अहवालात सांगण्यात आलं होतं.
करोनाचा प्रसार होऊ लागताच सोशल मीडियावर सुद्धा वेगाने रुग्णांची आकडेवारी, उपचार याविषयी माहिती शेअर होत आहे. आता यापुढे करोना व्हायरसबाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध ठरू शकतो अशी माहितीही सध्या वायरल होत आहे. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक करून याबाबत खुलासा केला आहे. करोनाविषयी माहिती शेअर करण्यावर कोणताही दंडनीय गुन्हा दाखल केला जाणार नाही हे पीआयबी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा>> करोनाच्या नव्या व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही १० उपकरणं; जाणून घ्या किंमत आणि उपयोग
जरी माहिती शेअर करणे गुन्हा नसला तरीही कोविड १९ सारख्या गंभीर आजाराबाबत योग्य पडताळणी केल्याशिवाय माहिती शेअर करू नका. जबाबदार नागरिक व्हा असं आवाहन करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> विश्लेषण: मेंदू खाणाऱ्या अमीबाने वाढवली जगाची चिंता; कशी होते लागण? लक्षणं व उपचार काय?
एकीकडे, करोनाचा चीन मध्ये प्रसार वाढत असताना आता भारतात सुद्धा करोना विषयी चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मॉक ड्रीलच्या माध्यमातून रुग्णालयाची तयारी, व्हेंटिलेटरची उपलब्धता, व इतर संसाधनांची माहिती घेण्यात येत आहे. याची माहिती घेण्यात आली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारपरिषदेतून याबाबत माहिती दिली होती.