A video of a cow and a bull causing chaos inside a home : भटक्या पाळीव प्राण्यांचे मानवी वस्तीमध्ये वावर दिवसेंदिवस वाढत आहे पण हे प्राणी जेव्हा माणसांवर हल्ला करतात तेव्हा मात्र तो चिंतेचा विषय ठरतो. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांन श्नान, गाय किंवा बैल हल्ला केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर या पूर्वी व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरु पाळीव प्राणी जाताना दिसले तर जीव मुठीत घेऊन जावे लागते. पण आता पाळीव प्राणी थेट घरात शिरत असल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे सर्वांच चिंता आणखी वाढत आहे.

भारतातील रस्त्यावर भटक्या प्राणी दिसणे काही नवीन गोष्ट नाही. पण या आठवड्याच्या सुरुवातीला फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घडली. एका महिलेला तिच्याच घरात अडकली होती कारण तिच्या घरात एक गाय आणि एक बैल घुसले. जवळपास दोन तास बाहेर त्यांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना राकेश साहू यांच्या घरी डबुआ कॉलनीत घडली. त्यांची पत्नी एकटीच प्रार्थनेत गुंतलेली असताना, गाय उघड्या दारातून आत आली. काही क्षणातच, एक बैल महिलेच्या मागे लागला आणि दोन्ही प्राण्यांनी बेडरूममध्ये आराम केला तेही अगदी बेडवर चढून.

घाबरलेल्या राकेशच्या पत्नीने कोणताही धोका पत्करला नाही; तिने स्वतःला एका कपाटात कोंडून घेतले आणि मदतीची वाट पाहत तिथेच थांबली.

राकेशची आई घरी परतली तेव्हा आत प्राणी पाहून तिला धक्का बसला. तिने शेजाऱ्यांना कळवले आणि लवकरच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी गर्दी जमली. पण, इतके लोक पाहून प्राणी अधिकच हट्टी झाले. पाण्याच्या बादल्या, मोठा आवाज आणि फटाके देखील त्यांना जागचे हलवू शकले नाहीत. दरम्यान, राकेशची पत्नी आतच बंद होती आणि वेळ जात असताना ती अधिकच अस्वस्थ होत गेली.

शेवटी, एका शेजाऱ्याने त्याचा पाळीव कुत्रा आणला, जो लगेच गाय आणि बैलांवर भुंकू लागला. त्यामुळे गाय आणि बैलाने शेवटी घरातून काढता पाय घेतला. अखेर एकामागून एक गाय आणि बैल घराबाहेर पडले.

या घटनेमुळे फरिदाबादमध्ये भटक्या प्राण्यांच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच, एका माजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर बैलाने हल्ला केल्याने तो जखमी झाला.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये फरिदाबाद महानगरपालिकेला ३० दिवसांच्या आत शहराबाहेर काढण्याचे निर्देश देऊनही, फारशी कारवाई झालेली दिसून येत नाही.