Cow attack video: काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यामुळेच कदाचित त्यांना पाळीव प्राणी असं म्हटलं जातं. परंतु या पाळीव प्राण्यांना जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर झाला तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते घातक ठरू शकतात. मग अशावेळी त्या चवताळलेल्या प्राण्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं. परंतु काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते.त्यांना त्रास दिल्यावर किंवा त्यांची शांतता भंग केल्यावर ते रागाच्या भरात काय करतील याचा काही नेम नाही. अशा प्राण्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून एका व्यक्तीनं चक्क गाईची शेपूट चावली आहे, त्याच्या या कृत्याची त्याला लगेच शिक्षाही मिळाली आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने चक्क गाईची शेपूट हातात घेऊन तिला स्वत:च्या कपड्यात गुंडाळून चावली आहे, यानंतर गाईला प्रचंड वेदना झाल्या असतील हे व्हिडीओमधून दिसत आहे. त्यामुळे गाईनेही क्षणात त्या व्यक्तीला इंगा दाखवला. गाईने जोरात त्याला तशील पाठीमागे लाथ मारली. ही लाथ त्या व्यक्तीला इतक्या जोरात लागली की तो सुद्धा कळवळत खाली बसला. त्यामुळे विनाकारण प्राण्यांना त्रास देऊ नये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! हॉस्टेलमध्ये चहाच्या किटलीत जिंवत अळ्या; Video पाहिलात तर कधीच चहा पिणार नाही..

व्हिडीओ पाहिला तर, तो व्यक्ती नक्कीच गंभीररित्या जखमी झाला असणार असंच दिसतेय. या व्हिडीओवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader