Cow’s Dohale Jevan: मातृत्व ही महिलांच्या जिवनातील सुंदर अनुभव असतो.कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करत असतात. महिलेच्या या आईपणाच्या प्रवासात तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला जातो. लवकरच होणाऱ्या आईसाठी अगदी थाटामाटात सगळ्या गोष्टी केल्या जातात. सध्या असंच डोहाळ जेवण एका ठिकाणी झालंय, मात्र हे डोहाळ जेवण महिलेचं नाही तर गाईचं आहे. या व्हिडीओत गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाईचं डोहाळजेवण

सोशल मीडियावरील या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय. या व्हिडीओमध्ये एका डोहाळ जेवणाचा कार्यक्रम दाखवला आहे. अनेकजण डोहाळ जेवणाची तयारी करताना दिसतायत. रांगोळी, फुलांची आरास, डोहाळ जेवणाची नेम प्लेट अशी तयारी सुरू असताना तुम्हालाही हेच वाटेल की एखाद्या महिलेचं डोहाळ जेवण आहे. पण या व्हिडीओत एक सुंदर ट्विस्ट येतो जेव्हा कळतं की हे डोहाळ जेवण गाईचं म्हणजेच गोमातेचं आहे.

हेही वाचा… आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक

व्हिडीओमध्ये गाईच्या अंगावर सुंदर असा पोशाख घालून तिला फुलांनी सजवलेलं दिसतंय. गायदेखील अगदी आनंदात उड्या मारत हा दिवस साजरा करताना दिसतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @av_graphics_edit_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “राधाचे डोहाळे जेवण” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… प्रॉपर्टीसाठी भांडणारी भावंडं पाहिली असतील, पण आईसाठी झगडणाऱ्या ‘या’ मुलाने जे केलं ते एकदा पाहाच, VIDEO होतोय VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मला आधी वाटलं की कोणीतरी ताई असेल, पण तुमच्या या व्हिडीओने नादच केला राव”. तर दुसऱ्याने “सर्वात सुंदर आई” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “तुम्ही जी सेवा करताय ते बघून खूप भारी वाटलं” तसंच “खरंच खूप छान, हे फक्त शेतकरी करू शकतो”, “खूपच भारी, पहिल्यांदा रील पाहून एवढा आनंद झालाय आणि कित्ती प्रेम”, “आई गं… आत्तपर्यंत पाहिलेला सगळ्यात गोड डोहाळे जेवणाचा व्हिडिओ” अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स व्हिडीओला आल्या आहेत.