सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. सामान्य लोक फक्त खाण्यापिण्याचे शौकीन नसतात, तर प्राणी देखील असतात. एका गायीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक गाय आपल्या वासरासह पाणीपुरीचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ सर्वांनाच चकित करणारा आहे, त्यामुळेच तो व्हायरलही होत आहे.
नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक गाय तिच्या वासराला पाणीपुरी देत आहे. अशाप्रकारे गाईला पाणीपुरी पहिल्यांदाच बघितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा: एलियन होण्यासाठी केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया; केले लाखो रुपये खर्च)
(हे ही वाचा: ‘या’ आजोबांची चूर्ण विकायची ही हटके पध्दत होतेय Viral; अनुराग ठाकूर यांनी शेअर केला Video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ दीपांशु शर्मा यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट करून लिहिले की “व्वा, पाणीपुरी सर्वांचे आवडते आहे.” आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, “अरे व्वा, खूप मजा आली.”