सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांचे बहुतेक व्हिडीओ हे मजेदारच असतात. मात्र सापाचा व्हिडीओ पाहून नेहमीच धडकी भरते. सापाला बघून माणसंच नाहीतर प्राणीही लांब पळतात. दरम्यान अशाच एका नागाचा आण गाईचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कोब्रा आणि गाय समोरा समोर आहेत. हा व्हिडीओ पाहून सुरुवातील भीती वाटते मात्र नंतर जे घडतं ते पाहून आश्चर्यही वाटतंय. नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.
जिथे विश्वास असतो तिथे प्रेम असते
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गोठ्यात गाईला बांधलं आहे. यावेळी एक किंग कोब्रा तिथे येतो आणि अगदी गाईच्या समोरच बसतो. हळूहळू तो गाईच्या तोंडाजवळ जातो. व्हिडीओ पाहताना वाटतं आता कोब्रा गाईवर हल्ला करणार आहे. मात्र पुढच्याच क्षणी दोघांमधलं प्रेम पाहायला मिळत आहे. गाय कोब्राला अक्षरश: जिभेनं चाटत आहे. तर मध्येच किंग कोब्राला किसही करत आहे. हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.
नेटकरी यावर वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलं आहे. “प्रेमानं जग जिंकता येतं”. तर दुसऱ्या युजरने लिहलं आहे, “जिथे विश्वास असतो तिथे प्रेम असते.”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> खाल्ल्या मिठाला जागलास पठ्ठ्या! मालकाचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांशी भिडला कुत्रा, VIDEO होतोय व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @susantananda3 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.