सरकारी रुग्णालयांबाबत अनेक तक्रारी तुम्ही आजवर ऐकल्या असतील. कोणतीही सुविधा नसणे, बेड उपलब्ध नसणे, रुग्णांची होणारी गैरसोय अशा असंख्य तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. पण सध्या यापेक्षा एक वेगळी तक्रार सरकारी रुग्णालयाबाबत करण्यात येत आहे,ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशमधील जिल्हा रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गाय चक्क रुग्णालयामध्ये फेरफटका मारत असल्याचे दिसत आहे. आयसीयु वॉर्डमध्येही गाईने प्रवेश केला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून रुग्णालय प्रशासनाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ही गाय रुग्णालयातील आरोग्यासाठी घातक असणारा कचरा खात असल्याचेही दिसत आहे. नेटकऱ्यांनी या रुग्णालयाच्या प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी इतका वेळ तिथले इतर कर्मचारी कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला आहे. ऑन ड्युटी असणाऱ्या सिक्युरिटी स्टाफने देखील दिवसभर या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, कोणीही गाय रुग्णालयात आल्याची दखल घेतली नाही. या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यानंतर या रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड आणि दोन स्टाफ मेंबर्सचे निलंबन करण्यात आले आहे.