तुम्ही खेकडे नक्कीच पाहिले असतील. साधारणपणे दिसायला लहान वाटणारे हे प्राणी अतिशय धोकादायक असतात. जगात खेकड्यांच्या ४ हजारांहून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी काही पाणी आणि जमीन दोन्हीमध्ये आढळतात. अनेक ठिकाणी लोक खेकडे खातात सुद्धा. यामध्ये भारताचाही समावेश आहे. खेकडा हा अनेक लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. खेकड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शाकाहारी तसेच मांसाहारी असतात. अशाच एका खेकड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कासवाची शिकार करताना दिसत आहे.
खरे तर खेकडाही लहान आकाराचा होता आणि कासवही, पण तरीही खेकडा त्याची शिकार करून त्याला सोबत ओढत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक अतिशय लहान कासव जमिनीवर अतिशय संथ गतीने रेंगाळत आहे, तेवढ्यात थोडा मोठा आकाराचा खेकडा त्याच्याकडे धावत येतो आणि येताच त्याला पकडतो. तो आधी त्या कासवाला घट्ट धरतो आणि मग त्याला थोडे ओढून त्याच्या बरोबर घेऊन जातो. तुम्ही सिंह, वाघ, बिबट्या यांसारख्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल, पण खेकड्याला अशी शिकार करताना आणि तेही कासवाची शिकार करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा खूपच धक्कादायक व्हिडिओ आहे.
( हे ही वाचा: VIDEO: पाण्यात मगरीची नाही तर कुत्र्याची दहशत; केला थरकाप उडवणारा हल्ला, पाहा हा व्हिडीओ)
खेकड्याने कासवाला कसे नेले ते एकदा पहाच
( हे ही वाचा: Video: ‘चुप के से लग जा गले…’ पाकिस्तानच्या ‘Pawari Girl’ ने गायले बॉलीवूड गाणे; ऐकल्यानंतर भारतीय लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. १३ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत १६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.