Crab Bite Tongue Stunt video: अनेकांना प्राण्यांशी खेळायला त्याच्ंयाशी मस्ती करायला खूप आवडतं. परंतु प्राण्यांनाही मन असतं हे ते विसरतात. आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो पण नंतर आपण सहन करत नाही. तसंच आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. मग ते चांगलाच इंगा दाखवत सर्वशक्तीनिशी समोरच्याला धडा शिकवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेकड्याने जीभेचा घेतला कडकडून चावा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण खेकड्याला हातात पकडून त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं खेकड्याला अगदी त्याच्या तोंडासमोर आणलं आहे. खेकड्याची एक नांगी पकडून त्याच्यासोबत खेळत आहे. असं करताना त्याला जराही भिती वाटत नाहीय. तो बिंधास्त त्याच्यासोबत खेळत आहे. त्याने खेकड्याला अक्षरश: त्याच्या जीभेजवळ आणलं आहे, ते खेकड्याच्या नांग्यामध्ये जीभ टाकयचा आण बाहेर काढायचा. मात्र हे सगळं खेकड्याला आवडलेलं दिसत नाही.

परत चुकूनही नाद करणार नाही…

दरम्यान खेकडा अचानक त्या तरुणाची जीभ आपल्या नांग्यांनी पकडतो. यानंतर त्या व्यक्तीला प्रचंड वेदना होत असून तो मोठ मोठ्यानं ओरडायला लागतो आणि खेकड्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. मात्र खेकडा काही त्याची जीभ सोडत नाही. नंतर या तरुणाच्या मदतीला त्याचे मित्र येतात मात्र अतिशय ताकदीनं खेकड्याानं पकडून ठेवलेलं असतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गरागरा फिरणारा पाळणा अचानक तुटला; ५० जण पाळण्यात उलटे अडकले, थरकाप उडवणारा दिल्लीतील VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे. अशा प्रकारे प्राण्यांशी खेळणे कसे अंगलच येऊ शकते हे या व्हिडीओवरुन कळते. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज गेले आहेत. तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crab bite tongue stunt goes in badly wrong as giant crab bite mans tongue video viral on social media srk