खेकड्याने आपल्या नाग्यांनी एकदा का कुणाला पकडलं तर सोडता सोडत नाही. खेकड्याचे नांगे इतके मजबूत असतात की ते एखाद्याला रक्तबंबाळ देखील करू शकतात. समुद्री खेकडे हे फारच खतरनाक असतात. एकदा का त्यांनी डेंगा मारला की मग रक्त काढल्याशिवाय ते मागे येत नाहीत. अन् त्यात जर का लाल रंगाचा खेकडा असेल तर मग विचारायलाच नको. अशाच एका खेकड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या एवढ्याश्या खेकड्यानं चक्क भल्यामोठ्या गरूडाची शिकार केली आहे. विश्वास बसत नाही ना मग पाहा हा व्हिडीओ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरूड हा सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा पक्षी पार समुद्राच्या पाण्यात शिरून माशाची शिकार करण्याची क्षमता ठेवतो. या पक्षासमोर तर किंग कोब्रा सारखा सर्वात विषारी साप सुद्धा पाणी मागत नाही. अशा या अनुभवी शिकाऱ्यावर चक्क एक चिमुकला खेडका भारी पडला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गरूड नदीच्या काठावर बसून पाण्यात पोहणाऱ्या खेकड्याची शिकार करत होतं. पण त्यानं या खेकड्याला चुकीच्या पद्धतीनं पकडलं. परिणामी खेकड्यानं पूर्ण ताकतीनिशी या गरूडाची चोच आणि डोळे पकडले. अर्थात त्याच्या या कृतीमुळे खेकडा भडकला अन् त्यानं चांगलाच चावा घेतला. हळूहळू त्यानं गरूडाच्या डोक्यावर सुद्धा विळखा घातला. परिणामी गरूडला प्रचंड वेदना जाणवू लागल्या. या खेकड्याला खाली फेकण्यासाठी गरूड धडपड करून लागला. पण या नादात तो खाली पाण्यात पडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दादर स्टेशनबाहेर चिमुकलीचा संघर्ष! खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके, VIDEO पाहून म्हणाल जबाबदारीला वय नसतं! 

हा व्हिडीओ @wuilrue या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crab fight with eagle animal video viral news in marathi crab attack video viral on social media srk