Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूपदेखील आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. जेव्हा एक शांत आणि एक चलाख प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष.दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल? हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कासवाने चक्क खेकड्यासमोर जाण्याची डेअरिंग केली आहे. आता कासव स्वत:हून खेकड्यासमोर जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात गेल्यासारखंच आहे. पण इथं मात्र उलटंच घडलं. एका कासवाने चक्क खेकड्याची शिकार केली आहे. खेकड्याला कासवाला त्रास देणं चांगलंच महागात पडलं आहे. खेकडा कासवाजवळ जाऊन त्याला त्रास देत असताना शांत कासवाच्या संयमाचा अंत झाला आणि असं काही घडलं की जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कासवाने एका क्षणात खेकड्याला आपल्या जबड्यात ओढलं असून जीवन-मरणाच्या लढाईतही कासव जिंकले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” गाईला दगडं मारताच तरुणाबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ek_kattar_mitra_tanmaymasalkar नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना “शांत बसलेला मजा घेऊ देत आहे,म्हणुन त्याच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायला जाणाऱ्या नादान लोकांना हे उदाहरण दाखवा” हा व्हिडिओ आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दोन हजारांहून अधिक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा व्हिडिओ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले. एकानं म्हंटलंय की “म्हणूनच कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”