सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत आहेत. परंतु हे गाणं गाणारा व्यक्ती कोणताही प्रख्यात गायक नसून रस्त्यावर शेंगदाणे विकणारा सामान्य माणूस आहे. यांचं नाव भुबन बड्याकर असे आहे.
पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुबन हातगाडी घेऊन ठिक-ठिकाणी जाऊन शेंगदाणे विकतात. त्याचवेळी कोणीतरी, भुबन यांचा अनोख्या शैलीत गातानाचा व्हिडीओ शूट केला. इंटरनेटवर हा व्हिडीओ अपलोड होताच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. यानंतर लोकांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून भुबनला रातोरात प्रसिद्ध केले.
Video : संकेत म्हात्रे – आवाजाच्या दुनियेतील मराठमोळं नाव । गोष्ट असामान्यांची – भाग १२
या गाण्याने भुबन यांचे आयुष्यच बदलून टाकले. सध्या ते एका युट्युब व्हिडीओमध्ये हिरो म्हणून डान्स करताना दिसत आहेत. खरंतर भुबन यांच्या गाण्याचे हरियाणवी व्हर्जन तयार केले गेले आहे. या व्हिडीओमध्ये भुबन यांचा बदललेला अंदाज लोकांना पाहायला मिळतोय. ५ फेब्रुवारीला हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओला लोकांची पसंती मिळत आहे.
या गाण्यात भुबन यांचा लूक पूर्णपणे बदललेला आपण पाहू शकतो. भुबन एखाद्या हिरोपेक्षा कमी वाटत नाही आहेत. रॅपर आणि गायक अमित ढुल यांनी भुवनेसोबत मिळून हे नवीन गाणे तयार केले आहे. हरियाणवी व्हर्जनच्या या गाण्याला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडीओमध्ये भुबन यांच्यासोबत अमित ढुल आणि नताशा भट्ट दिसून येत आहेत. हरियाणवी व्हर्जनच्या या गाण्यात भुबन आपले बंगाली गाणे गाताना दिसत आहेत. तर, हरियाणवी भाग डेव्हिल कागसरिया यांनी संगीतबद्ध केले आहे.