दिवसेंदिवस सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओजने धुमाकूळ घातला असतानाच आता नवीन एक थरारक व्हिडीओ चर्चेत आला आहे. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काही जण जीव धोक्यात टाकून काय अजब कारनामे करतील, याचा नेम राहिला नाही. कारण, एका व्यक्तीने माणसाची नाही, तर चक्क मगरीची मसाज करायला गेला अन् तोच मगरीने त्याच्यावर हल्ला चढवला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – चॅटिंगच नाही तर आता WhatsApp वर शॉपिंगही, नंबरशिवाय युजरला शोधता येणार, भन्नाट फिचरबाबत जाणून घ्या सविस्तर

जगभरात अशा खोडकर मुलांची कमी नाहीय. सोशल मीडियावर हिरोगिरी करण्याच्या नादात स्वत:ला मृत्यूच्या दारात ओढण्यात अशी माणसं अग्रेसर असतात. व्हिडीओ काढण्यासाठी कोणत्याही परिणामांचा विचार करत नाहीत. आता याच पठ्ठ्याने मगरीची मसाज करायचं ठरवलं, त्यानंतर मगरीने त्याच्यावर जो हल्ला केला त्यातून तो कसाबसा वाचला. नदीच्या किनारी असलेल्या मगरीची मसाज करण्याची त्याने हिंमत तर केलीच. पण अशा या क्रेझी बॉयचा मुर्खपणा त्याला मरणाच्या दारात घेवून गेला असता.

इथे पाहा व्हिडीओ

हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडीओत एक भलीमोठी मगर नदीच्या बाहेर येऊन आराम करताना दिसते. मात्र, या मगरीला पाहून एक क्रेझी बॉयला तिच्याजवळ जातो आणि चक्क तिच्या पाठीवर मसाज करू लागतो. त्यानंतर रागाने फणफणलेल्या मगरीने या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या तरुणाने स्वत:ला सावरून मगरीच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान, या वेड्या तरुणाला त्याच्या जीवनाचं महत्वच कळलं नाही, म्हणून त्याने हा कारनामा केला, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crazy boy giving massage to crocodile what happens next is very dangerous crocodile attack viral video on instagram nss