जवळपास सर्व जण आपल्या घरात एखादा पाळीव प्राणी म्हणून कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळतात. पण सोशल मीडियावर असणाऱ्या ‘द रिअल टारझन’ नावाच्या व्यक्तीने आपल्या घरात चक्क अजगर पाळला असून, सध्या त्याने या अजगरासोबत शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा चांगलीच रंगत आहे. काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून, त्या माणसाच्या हिमतीबद्दल फारच कौतुक वाटले; तर काहींना त्याची काळजी वाटत असल्याचे व्हिडीओबाबत आलेल्या कमेंट्सवरून दिसून येते.

आता लोकांच्या काळजीचे कारण हे केवळ एक अजस्र अजगर एवढेच नसून, त्या व्यक्तीने व्हिडीओसाठी निवडलेली जागादेखील होती. कारण- फोटो काढण्यासाठी ती व्यक्ती आपल्या पाळीव अजगरासोबत स्विमिंग पूलमध्ये उतरली होती. आता त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार खरोखरच धोकादायक ठरू शकत होता. काही कारणाने जर त्या अजगराने त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, तर स्वतःच्या बचावासाठी ती व्यक्ती काहीच करू शकली नसती. सोशल मीडियावर @therealtarzann या इन्स्टाग्राम युजरने आपल्या अकाऊंटवरून आपल्या पाळीव अजगारासोबत शेअर केलेला हा व्हिडीओ काही वेळेतच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून, काहींना कौतुक वाटले; तर काहींना त्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत काळजी वाटत आहे.

a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून
The monkey sat on the woman's head
“तो तिच्या डोक्यावरच बसला…” भूक लागली म्हणून माकडाचा पराक्रम; महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून व्हाल शॉक
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण

‘हिरवा अजगर. जंगलाचा राजा,’ या कॅप्शनसह @therealtarzann या सोशल मीडिया युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओला ८२ हजार इतके व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने त्या अजगराला आपल्या मानेभोवती गुंडाळून घेतल्याचे दिसते. त्यानंतर ती व्यक्ती अजगर गळ्यात तसाच ठेवून पाण्याखाली जाते आणि काही सेकंदांनी वर येते. वर आल्यानंतर तो अजगर कॅमेऱ्याच्या दिशेने पुढे सरकताना दिसतोय.

हेही वाचा : चोरी पकडताच चोर गेला पळून; चार पायांच्या चोराचा हा Video एकदा पहाच

आता या व्हिडीओवर दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये काही जण @therealtarzann ही व्यक्ती किती हिंमतवाली आहे, असे म्हणत, त्यानं अजगर पाण्यात असताना किती शांतपणे आणि कौशल्याने अजगराला सांभाळलं आहे हे बघून कौतुक करीत आहेत; तर दुसरीकडे काही मंडळी, त्या व्यक्तीनं अजगरासोबत अशा ठिकाणी जाणं जीवघेणं ठरू शकतं, असं सांगून आपली काळजी दर्शविली आहे.

लोकांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नक्की काय आणि कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते पाहू.

“हाच तो साप आहे, जो मला काही दिवसांपूर्वी चावला होता. आज या सापाचा मूड चांगला दिसतो आहे.” अशी मिश्कील कमेंट एकाने दिली. ज्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याने पहिल्या व्यक्तीला विचारले, “मग या सापाच्या विळख्यात अडकायला नको म्हणून तुम्ही काय केलेत?”
तर दुसऱ्याने, “जो हा व्हिडीओ शूट करीत होता तो प्रचंड घाबरला होता. त्याला मागे जाताना पाहिलं मी.” अशी कमेंट केली. तिसऱ्याने “जंगलामध्ये वाघ आणि सिंह असताना, अजगराला राजा का म्हटलं?” अशी विनोदी प्रतिक्रिया दिली. चौथी व्यक्ती, “तुम्ही ज्या पद्धतीनं या प्राण्यांबद्दलचे व्हिडीओ शेअर करता, त्यामुळे मला प्राण्यांबद्दल छान गोष्टी शिकायला मिळतात”, असे म्हणत आहे.

तर शेवटी सहाव्या कमेंटमध्ये “बापरे! अजगरासोबत पाण्याच्या आत जाण्याची हिंमत म्हणजे.. अगदी कमाल!” असं म्हणत @therealtarzann या इन्स्टाग्राम युजरचे कौतुक केलेले बघायला मिळते.

Story img Loader