अनेकांच्या घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा उपयोग करण्यात येतो. वॉशिंग मशीनमुळे वेळही वाचतो व कपडे स्वच्छ धुवून निघतात. त्यामुळे विविध कंपन्याचे अनेक वॉशिंग मशीन बाजारात उपलब्ध असतात. पण, तुम्ही कधी जगातील सगळ्यात लहान वॉशिंग मशीन पहिली आहे का ? नाही; तर आज आंध्र प्रदेशातील रहिवासी साई तिरुमला नीदी या तरुणाने जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन बनवली आहे. त्यामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळाला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, छोट्या छोट्या वस्तूंचा उपयोग करून तरुणाने वॉशिंग मशीन बनवली आहे. त्यानंतर मशीनला स्विच, लहान पाईप, मशीनची बटणे आणि सगळ्यात शेवटी झाकण तयार करून त्याची चाचणीसुद्धा केली आहे. तरुण मशीनमध्ये कापडाचा लहान तुकडा, पाणी आणि काही वॉशिंग डिटर्जंटची पावडर टाकताना दिसत आहे. त्यानंतर ही छोटी मशीन कसे कार्य करते ते दाखवतो. व्हिडीओमध्ये व्यक्ती कापडाचा तुकडा मशीनमध्ये स्वच्छ धुवून काढल्यानंतर बाहेर काढतानाही दिसते.
हेही वाचा…पैसे द्या तरचं… Byju कंपनीवर संतापले पालक; कार्यालयात गेले अन् उचलली ‘ही’ महागडी वस्तू ; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
साई तिरुमला नीदीद्वारे बनवण्यात आलेली सर्वात लहान वॉशिंग मशीन ३७ मिमी x ४१ मिमी x ४३ मिमी (१.४५ इंच x १.६१ इंच x १.६९ इंच) आहे, असे गिनीज वर्ल्ड ऑफ बुक्स रेकॉर्ड यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. विविध कंपन्यांच्या मोठ्या वॉशिंग मशीनची रचना आणि वैशिट्ये लक्षात घेऊन त्याने जगातील सगळ्यात लहान वॉशिंग मशीन तयार केली आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत @guinnessworldrecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण तरुणाच्या या अनोख्या कामगिरीचे कौतुक आणि जगातील सगळ्यात लहान वॉशिंग मशीनचे विविध शब्दात प्रशंसा करताना दिसून आले आहेत.