मगर किती क्रूर आणि हिंस्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करते. यामुळे म्हटलं जातं, की पाण्यात राहून मगरीसोबत दुश्मनी कधीच घेऊ नये. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मगरीचं नुसतं नाव जरी निघालं तरी मनात धडकी भरू लागते. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात एका माणसाने मगरीचा खाऊ घालण्याचं भलतंच धाडस केलंय. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर मॅट राइटचा आहे, जो मगरीवर आधारित प्रसिद्ध शो आउटबॅक रँग्लरमध्ये झळकला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मॅट पाण्याच्या अगदी जवळ उभा असलेला दिसून येतोय. पाण्यात कोणतीही हालचाल झालेली दिसून येत नाही. मॅट आपल्या हातात मांसाचा एक तुकडा घेऊन हळुहळु पाण्याजवळ जातो. मॅट बराच वेळी आपल्या हातातलं मांस घेऊन पाण्यातल्या मगरीसमोर फिरवत होता. पाण्याच्या अगदी खालून एक मगर मॅटकडे एकटक पाहत होती. पुढच्या क्षणी जे काही झालं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ केवळ २५ सेकंदांचा आहे, मात्र तो पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढू शकतात.

आणखी वाचा : स्कूल बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या विद्यार्थीनींचा VIDEO VIRAL

मॅटच्या हातातलं मांस पकडण्यासाठी मगर आपला मोठा जबडा उघडते, आणि मॅटच्या अंगावर झेप घेते. मगरीला अगदी जवळून पाहून मॅटचीही अवस्था वाईट होते. मगरीनं त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकता, परंतु मॅट कसा तरी तेथून लांब राहण्यात यशस्वी होतो आणि मांसचा तुकडा मगरीच्या तोंडात टाकतो. हे दृश्य फारच भीतीदायक आहेत. पण या दरम्यान थोडी सुद्धा चूक झाली असती तर कदाचित हा प्रयत्न जीवावर बेतला असता.

आणखी वाचा : Viral Video : उंटासोबत सेल्फी पडला महागात! घडलं असं काही की महिलेला थेट जमिनीवर आपटलं

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्टाईल मारायला गेला आणि तोंडावर आपटला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

हा व्हिडीओ नुकताच unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असला तरी लोक वारंवार हा व्हिडीओ पाहू लागले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ५४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय.

मगरीला हाताळण्याची मॅटची पद्धत लोकांना फार आवडली. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ‘विश्वासच होत नाही’, असं लिहित एका युजरने कमेंट दिली आहे. दुसऱ्या आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, ‘जर चुकून हा व्यक्ती पाय घसरून पाण्यात पडला असता तर…?’ तिसऱ्या एका युजरने लिहिलं की, “या मगरीने जर मांसाच्या तुकड्याऐवजी मॅटचा हातच खाल्ला असता तर …?” या व्हिडीओने साऱ्यांना आश्चर्यचकित करून सोडलंय.