World cup 2023, India vs Pakistan Match : यंदाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलीय. गुजरातच्या अहमदाबादमध्ये असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १५ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये मोठ्या संख्येत हॉटेल रुम्सची बुकिंग करण्यात आली आहे, अशी माहती समोर येत आहे. प्रत्येक हॉटेलच्या छोट्या-मोठ्या रुम्सची आगाऊ बुकिंग झाल्या असल्याचा दावा केला जात आहे. अशातच ज्या लोकांना हॉटेल रुम्स बुकिंग करण्यात अडचणी येत आहेत, ते क्रिकेटप्रेमी रुग्णालयातही जागा शोधत आहेत. लाखोंच्या संख्येत लोक सामना पाहण्यासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असेल. त्यामुळे एक रात्र विश्रांती घेण्यासाठी रुग्णालयात बेड बुक केले जात असल्याचं समजते आहे.
अहमदाबादमध्ये होणारा भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरातील सर्व हॉटेल आधीच बुक करण्यात आले आहेत. रुम उपलब्ध नाही किंवा ‘Room Booked’अशाप्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहेत. अशातच ज्या क्रिकेटप्रेमींना रुम मिळत नाहीय, ते अहमदाबादच्या रुग्णालयातही राहण्यास तयार आहेत. ते लोक असे रुग्णालय शोधत आहेत, जिथे बेड, नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा असेल.
नक्की वाचा – Oppenheimer: काय आहे IMAX? आयमॅक्स आणि सामान्य चित्रपटगृहात काय फरक असतो? जाणून घ्या
खासगी रुग्णालयांचा विकल्प
अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टनुसार, शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्यांच्या रुग्णालयात प्रत्येक सुविधा आहे. त्यामुळे लोक फुल बॉडी चेकअपसाठी पूर्ण रात्र थांबण्यासाठी विचारत आहेत. ते लोक कोणत्याही प्रकारची फी देण्यास तयार आहेत आणि हेल्थ चेकअपसाठी तातडीने अपॉइंटमेंट बुक करत आहेत. या क्रिकेटप्रेमींना सामना पाहायला मिळेल आणि फुल बॉडी चेकअपही होईल, असं जाणकार सांगतात. असे चाहते रुग्णालयातील डिलक्स रुमपासून सुटपर्यंत बुकिंग करत आहेत. परंतु, रुग्णालय प्रशासन रुग्णांना प्रथम प्राधान्य देत आहेत. रुग्णाला उपचार देणं, हे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे जबरदस्ती बेड देण्यात येणार नाही, असं रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.