Cricketers and Fans reaction on Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. ऋषभच्या अपघाताची बातमी कळताच संपूर्ण क्रिडा विश्वात खळबळ माजली आहे. दिल्लीहून घरी येत असताना ऋषभच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल येथील एका वळणावर कारला अपघात झाल्याचं कळते आहे. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला असून देहरादून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या धक्कादायक घनटेची बातमी कळताच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनाही धक्का बसला. “ऋषभ लवकर बरा हो” अशी प्रार्थना नेटकरी देवाकडे करत आहेत. ऋषभच्या तमाम चाहत्यांनी ‘गेट वेल सून ऋषभ’ अशा प्रकारच्या पोस्ट ट्विटरवर केल्या आहेत.
एका चाहत्यानं म्हटलं, “भाऊ लवकर बरा हो…”
एका युजरने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, आमचा चॅम्पियन खेळाडू ऋषभ पंतचा अपघात झाला. तो लवकर बरा होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ऋषभसाठी प्रार्थना करत आहे. सुदैवाने तो अपघातात बचावला. लवकर बरा हो चॅम्प.” तसंच अन्य एका युजरने म्हटलं, ऋषभ लवकर बरा होण्यसाठी प्रार्थना करते, “गेट वेल सून चॅम्प”. भाऊ लवकर बरा हो, आम्ही तुझ्यासाठी देवाकडे साकडं घातलंय. भारतीय संघ तुझ्या पदार्पणासाठी प्रतीक्षा करतोय.” असंही एकाने म्हटलंय.
नक्की वाचा – Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ
या अपघातानंतर ऋषभ पंतने स्वत: प्रतिक्रिया दिलीय, तो म्हणाला, “मी स्वत: कार चालवत होतो. कार चालवताना मला झोप लागली. त्यामुळे कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तातडीनं विंडो स्क्रीन फोडून मी बाहेर पडलो.” ऋषभच्या अपघाताबाबत डॉक्टरांनी दिलेली माहिती अशी की, “ऋषभ पंतच्या शरीरावर कोणत्याही गंभीर जखमा नाहीत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे. सध्या पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तापसणीनंतर पुढील दुखापतीबाबत समजेल.”