टिम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव असतो. वेगवेगळ्या माध्यमातून तो काही ना काही पोस्ट करत असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या अंदाजात तो लोकांना उत्तरे तर देतोच पण काही वेळा प्रश्नही विचारतो. याचेच उदाहरण म्हणजे सेहवागने नुकतेच केलेले एक ट्विट आहे. आपल्या फॉलोअर्सला दोन दिवसांपूर्वी सेहवागने एक प्रश्न विचारला होता. ”तुम्ही पासवर्ड कोणाच्या आठवणीत ठेवता?” असे ट्विट सेहवागने केले आहे. त्यावर त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

एक युजर म्हणतो, मी माझ्या सासऱ्यांच्या बँक अकाऊंटचा नंबर पासवर्ड म्हणून ठेवला आहे. त्यावर सेहवागने ‘वाह ससुरा’ असा रिप्लायही दिला आहे. तर चंद्रेश नावाच्या एका व्यक्तीने लिहीले आहे, गर्लफ्रेंड आपल्या आयुष्यातून निघून जाते पण तिच्या नावाचा पासवर्ड कायम राहतो. तर एकाने सांगितले की आपण सेहवाग हाच पासवर्ड ठेवला आहे. तर एक जण म्हटला, वोट फॉर मोदी हा माझा पासवर्ड आहे. आता हा पासवर्ड वीरुने नेमका मोबाईलचा विचारला की कॉम्प्युटरचा याबाबत मात्र समजू शकले नाही. तसेच अचानक त्याने हा प्रश्न विचारण्यामागचे कारणही माहित नाही. पण त्याच्या या ट्विटवर दोन दिवसांत १९०० जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader