Cricket Umpire Funny Video : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आता देशभरातूनच नाही जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडूनही टीम इंडिया विषयीच्या चर्चा आहेत. यात क्रिकेटपटूंची खेळण्याची शैली, त्यांच्या छोट्या-छोट्या मुलाखती, त्यांचे वैयक्तिक आयुष्यातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टी सगळ्याच ट्रेंडिंग होत आहे. ट्रॉफी जिंकणारी टीम इंडियाने आता देशभरातील क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या क्रिकेटच्या चर्चेत आता एका अंपायरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या मैदानातील या अंपायरचे हावभाव पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

युजर्सना या अंपायरची स्टाइल खूपच आवडली आहे. यावरून अनेकांनी हा अंपायर आहे की जोकर असा मजेशीर सवाल केला आहे.

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

अंपायरची स्टाइल झाली व्हायरल (Cricket Umpire Viral Video)

कोणताही क्रिकेट सामना असो, संघातील खेळाडूंव्यतिरिक्त एक अंपायरदेखील मैदानात उपस्थित असतो, ज्याचे काम खूप महत्त्वाचे असते. खेळाडू आऊट आहे की नाही, बॉल वाइड बॉल होता की नो बॉल. खेळाडूने चौकार मारला की षटकार; ही सर्व माहिती इशाऱ्याने देण्याचे काम अंपायर करत असतो. यासाठी अंपायरच्या हाताने करण्याचे इशारे/चिन्ह असतात, ज्या केवळ भारतातच नाही जगभरातील क्रिकेट सामन्यांमध्ये वापरल्या जातात. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा अंपायर सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो ज्या पद्धतीने इशारे करत आहे, ते पाहून कोणालाही पोटधरून हसायला येईल. या अंपायरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूरत टॅनिक क्रिकेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अंपायर अगदी वेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आहे, ज्याला पाहून लोक क्रिकेटच्या मैदानात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारत आहेत. कारण कधी तो क्रिकेटच्या मैदानावरच डोक्यावर उभा राहून इशारे करतो, तर कधी तो कंबर हलवत, कधी व्यायाम करत असतो. त्याची ही हटके आणि तितकीच मजेशीर स्टाइल पाहून युजर्स अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत. (Cricket Umpire Viral Funny Video)

More Stories On Viral News : “काँग्रेसचे लोक माझ्या खिशात” शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा, मुख्याध्यापकाची पकडली कॉलर अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

अनेक युजर्स अंपायरला खूप टॅलेंटेड म्हणत आहेत, तर काही युजर्सनी लिहिले की, ‘हा अंपायर डान्सर आहे की योगा करणारे रामदेव बाबा? हे सांगणे कठीण आहे.’ अनेकांनी अंपायरचे मैदानातील हावभाव पाहून त्याची तुलना जोकरशी केली आहे.

Story img Loader