अजिंक्य रहाणे हा भारताचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले आहेत. पण क्रिकेटनंतर तो एक खाद्यप्रेमी देखील आहे. रोज हेल्दी डाइट आणि रुटीन फॉलो करताना तो काहीवेळा तो आवडीचे पदार्थही खातो. यात अनेकदा टूरवर असताना अजिंक्य रहाणेला आम्रखंड किंवा श्रीखंड पूरी खायला खूप आवडते. यात नुकताच इन्स्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात क्रिकेटर आ्म्रखंड बनवताना दिसत आहे. रहाणेसोबत प्रसिद्ध शेफही दिसत आहे. दोघेही आम्रखंडसोबत पुरी खाणे एन्जॉय करताना दिसत आहेत. क्रिकेटरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याला ‘चीट मील’ असे नाव दिले आहे.
क्रिकेटर अजिंक्य रहाणे बाबत असे सांगितले जाते की, त्याला मुंबईतील स्ट्रीट फूड खायला आवडते. यात श्रीखंड-पुरी खाणे त्याच्या आवडीचे आहे. ज्याचा ताजा पुरावा हा व्हिडिओ देत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून क्रिकेटर रहाणेने आम्रखंड किंवा आंब्याचे श्रीखंड घरच्या घरी कसे बनवायचे हे सांगितले आहे.
आम्रखंड बनवण्याची रेसिपी
क्रिकेटर अजिंक्य रहाणे शेफसोबत श्रीखंड पुरी खाण्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. हा पदार्थ दही आणि आंबा घालून तयार केला आहे. विशेष म्हणजे ते खाल्ल्याने थंडपणाही जाणवले. हा पदार्थ बनवण्याची कृती खूप सोप्पी आहे आणि त्याची चवही अप्रतिम आहे.
आम्रखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) ३०० ग्रॅम घट्ट दही
२) ३ चमचे पावडर केलेली साखर
३) १ टीस्पून वेलची पावडर
४) थोडेसे केशर
५) १ कप मँगो प्युरी, पिस्ता (सजवण्यासाठी)
घरच्या घरी असे बनवायचे आम्रखंड
१) प्रथम एका सुती कपड्यात दही बांधून ते ४ ते ५ तासांसाठी कुठेतरी लटकून ठेवा. जेणेकरुन त्यातील पाणी बाहेर पडेल.
२) यानंतर मँगो प्युरी बनवा आणि त्यात बाकीचे साहित्य मिसळा.
३) आता मँगो प्युरी वेलची पूड आणि केशर टाकल्यानंतर त्यात घट्ट दही टाका आणि मिश्रण एकजीव करा.
अशाप्रकारे क्रिकेटर अजिंक्य रहाणे स्टाईलने तयार केलेले आम्रखंड पुरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. मुंबईसारख्या शहरात अनेकांना श्रीखंडसोबत पुरी खायला खूप आवडते.