भारताचा स्टार ऑफस्पिनर हरभजन सिंग आपल्या एका पोस्टमुळे ट्विटरवर ट्रेंड करत आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७व्या वर्षानिमित्त हरभजनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली. यात त्याने सुवर्ण मंदिरात ठार झालेल्या जर्नलसिंह भिंडरांवालेला श्रद्धांजली वाहिली आणि शहीद म्हटले. या पोस्टमध्ये हरभजनने भिंडरांवालेचे नाव घेतले नाही.

१ जून ते ८ जून १९८४दरम्यान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. भारतीय सैन्याने केलेले ही एक मोठी मोहिम होती. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ऑपरेशनला परवानगी दिली होती. पंजाबमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यंत्रणा सुधारण्यासाठी हे ऑपरेशन चालविण्यात आले होते. या कारवाईचा एक भाग म्हणून, शीख समुदायासाठी राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या भिंडरांवालेच्या नेतृत्वातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्याने १९८४मध्ये सुवर्ण मंदिरात प्रवेश केला.

हेही वाचा – काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीने स्कॉटलंडहून मागवला महागडा घोडा

harbhajan singh glorifies khalistani terrorist jarnail singh bhindranwale on death anniversary
हरभजनची पोस्ट

 

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

 

हेही वाचा  ‘‘हे करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी कर”, ट्रोल झाल्यानंतर सौरव गांगुलीनं ‘ती’ पोस्ट हटवली

या पोस्टमुळे हरभजन खूप ट्रोल होत आहे. हरभजन सिंगने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला नाही. तो आयपीएलमध्ये खेळत असला, तरी प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान तिथेही निश्चित नाही. आयपीएल २०२१च्या आधी, एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिलिज केले होते आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने त्याला संघात घेतले.

Story img Loader