Sachin Tendulkar Wish Marathi Bhasha Gaurav Din : महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध स्तुत्य कार्यक्रम राबविले जात आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खास मराठमोळ्या शैलीत सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर यासाठी एक खास पोस्ट केली; जी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महाराष्ट्राचा सुपुत्र व क्रिकेट चाहत्यांचा देव असलेल्या सचिनने मायमराठीबद्दल कौतुकौदगार काढले आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण सर्वांनी आपल्या या सुंदर मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा, असे ट्वीट सचिनने केले आहे. तसेच त्याने #मराठीभाषागौरवदिन हा टॅगदेखील वापरला आहे. सचिनचे असे मराठमोळ्या पद्धतीने व्यक्त होणे त्याच्या चाहत्यांना भावले आहे.
मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?
सचिन तेंडुलकरच्या या पोस्टखालीही अनेकांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.