विश्वचषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही देशांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत, त्यामुळे आता या दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींना शनिवारी होणारा सामना पाहण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच भारत-पाकिस्तान सामना प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. शिवाय या दोन्ही संघाचे खेळाडू सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. शोएब अख्तर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अशातच आता त्याने त्याच्यासारखेच दिसणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना एका महिलेची ओळख करून देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला स्वतःची ओळख करून देते. यानंतर शोएब अख्तर तिच्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, “ही शोएब अख्तरची महिला व्हर्जन आहे.” यावेळी ती मुलगीदेखील खूप आनंदी असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- “मला भारतातून हाकलले नाही मीच..”, हिंदू धर्माचा कथित अपमान करणाऱ्या पाक रिपोर्टर झैनाब अब्बासचा माफीनामा

शोएब अख्तरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला विनिता खिलनानी आहे, जी एक भारतीय टिकटॉकर आहे. ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार पोस्ट शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी चाहत्यांनी तिच्या आणि शोएबच्या चेहऱ्यात साम्य असल्याचं सांगितलं होतं. यानंतर विनिता आणि शोएब यांच्याशी संबंधित अनेक मजेदार मिम सोशल मीडियावर व्हायरल होत होते. विनिताने चाहत्यांच्या मतांना प्रतिसाद देण्यासाठी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तसेच तिने शोएबबरोबर केलेली तुलना आत्तापर्यंतची सर्वात आवडती तुलना असल्याचंही म्हटलं होतं. शिवाय तिने अनेक पोस्टमध्ये तिचे आणि शोएबचे फोटोदेखील शेअर केले होते. त्यामुळे अखेर आता शोएब विनिताला प्रत्यक्षात भेटल्याने दोघांचे चाहते व्हिडीओवर वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer shoaib akhtar shares video to meets his female version vinita khilnani goes viral on social media jap