सध्या देशात ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात भारताला आजवर एकही सामन्यात अपयश आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही क्रिकेटसंबंधीत जुने आणि नवे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक विराट कोहलीचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली चक्क धोनीची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बांग्लादेश विरुद्ध सामन्यात भारत गोलंदाजी करत आहे आणि विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की विराट कोहली हा धोनीची नक्कल करताना दिसत आहे. ज्या प्रमाणे धोनी क्षेत्ररक्षण करताना हातवारे करुन सुचना द्यायचा त्याचप्रमाणे विराट कोहली सुद्धा सुचना देताना दिसत आहे.त्यानंतर तो स्मित हास्य करत हसताना सुद्धा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच धोनीची आठवण येऊ शकते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटर्स कधी एकमेकांची नक्कल करतानाचे तर कधी डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीचे भारतासह जगभरात लाखो चाहते आहेत.

हेही वाचा : पुणेकरांचा नाद करायचा नाही! गाडीवर जागा कमी पडल्यामुळे तरुणीने चक्क डोक्यावर आणला आकाश कंदील, पाहा VIDEO

i.m.kfuns_78 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “धोनीची नक्कल करताना दिसला विराट कोहली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वडिलांची नक्कल करणे मुलाचे कर्तव्य असते” तर एका युजरने लिहिलेय, “अनुष्काबरोबर राहून नक्कल करणेही शिकला” आणखी एका युजरने लिहिलेय, “एका महान व्यक्तीला दुसऱ्या महान व्यक्तीची आठवण आली असेल म्हणून त्याने नक्कल केली” अनेक युजर्सना विराट कोहलीने केलेली नक्कल आवडली.

Story img Loader