Viral video: लहान मुले खूपच गोंडस आणि निरागस असतात. मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात. खरंच किती निरागस असतात ही मुलं…लहान मुलांना बघताक्षणीच मनं कसं प्रसन्न होऊन जातं. त्यांचे बोबडे बोल, ते निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावतं.असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मुलांना वेळेवर शाळेत पाठवण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालकही मेहनत घेतात. त्यासाठी त्यांना दैनंदिन दिनचर्याही बदलावी लागेल. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेत उशिरा पोहोचल्यानंतर मूल रडत रडत शिक्षकांना आपली व्यथा सांगत आहे. शाळेत यायला का उशीर होतो या प्रश्नाचं चिमुकल्यानं अगदी खरं खरं उत्तर दिलंय. या चिमुकल्याचं उत्तर ऐकून तु्म्हीही पोट धरुन हसाल.
चिमुकला शिक्षकांना सांगतो की, आई त्याला उठवत नाही, म्हणूनच त्याला शाळेत यायला उशीर होतो.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लहानगा शाळेत उशिरा पोहोचला आहे. उशिरा पोहचल्यामुळे मॅडम विचारतात की नेहमीच उशिरा का येत असतोस, यावर चिमुकला म्हणतो, “मम्मी स्वतः उठते पण मला उठवत नाही.” तेव्हा शिक्षक म्हणतात, “तु मला सांग की शाळेची वेळ ७.३० ची आहे आणि तू ८.३० वाजता येतोस. यावर चिमुकला रडवेला होता आणि म्हणतो मला माहीत नाही. हा व्हिडिओ @bachho_ki_badi_mam ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: चालता बोलता वाद झाला अन् भररस्त्यात आजीबाई एकमेकींना भिडल्या; खराटा अन् टप बालद्यांनी जोरदार हाणामारी
हा व्हिडीओ bachho_ki_badi_mam या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू अनावर झालं आहे. एका युजरने लिहिले, “कदाचित मूल सत्य बोलत असेल.” तर दुसऱ्या यूजरने लिहिले, “उशीरा येण्याचे कारण चांगले आहे.”