प्राण्यांना बोलता येत नाही, पण ते प्रेम व्यक्त करू शकतात. पण मुक्या प्राण्यासंदर्भात एक क्रौर्याचा प्रकार समोर आला आहे, जो पाहून प्रत्येक व्यक्ती हादरेल.भटक्या श्वानाचा त्रास प्रत्येकच नागरिकाला होत असतो. अनेकदा हे श्वान आपली आही चूक नसतानाही अंगावर धावून येतात आणि चावा घेतात. भटक्यांप्रमाणेच पाळीव कुत्र्यांपासून देखील अशा समस्या निर्माण होतात. भटक्‍या कुत्र्यांमुळे अनेक वाहनचालकांचा अपघात झाला आहे. असे असले तरी भटक्‍या कुत्र्यांना मारहाण करणे, छळ करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याचा पिल्ल्याचा छळ होताना दिसत आहे.  उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये कुत्र्यासोबत अतिशय क्रूर वागणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सरूरपूर गावातील बिंद्रपाल नावाच्या तरुणाने कुत्र्याचे दोन्ही पाय पकडून त्याला हवेत गोल-गोल फिरवले. सुमारे २ मिनिटे हा तरुण कुत्र्याला हवेत फिरवत राहिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शक्तीमान मालिकेचे शीर्षक गीतही ऐकायला येत आहे.

आरोपी बिंद्रपालनेच हा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यान्वये १९७१ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाविरुद्ध सरूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाह व्हिडीओ

हेही वाचा – Video: लागोपाठ ३ बाईकने चिरडलं, पुढच्याच क्षणी चिमुकली उठून उभी, नेटकरी म्हणतात हा तर चमत्कार!

दरम्यान, भारतीय वन संवर्धन कायदा १९७१ प्राण्यांची शिकार करणे, त्यांच्यासोबत स्टंटबाजी करणे, कोणत्याही प्राण्याची निर्घृण हत्या करणे हे गुन्हे आहेत. यामध्ये आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद आहे. या व्हिडिओला अनेक युजर्सने सोशल मीडियावर शेअर केलं आहे, तर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.