Shocking video: सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. मात्र घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात. अशाच एका जोडप्याला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे ते म्हणजे, “मर्द को दर्द नाही होता?’ हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला आपल्या पतीला अमानुष मारहाण करत आहे. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती एका मागोमाग त्याच्या कानाखाली मारत आहे. कधी त्याचे केस ओढत आहे तर कधी डोक्यात मारत आहे. महिलेने पतीचा हात पकडलेला दिसत आहे वारंवार ती पतीला निर्दयीपणे मारत आहे. आजूबाजूला काही लोक हे पाहत आहेत पण मध्यस्ती करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाहीये. दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेल्यापैकी कोणीतरही या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. अंगावर काटा आणणारी ही अत्यंत निर्दयी मारहाण सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Navi Mumbai, vehicle repair,
नवी मुंबई : वाहन दुरुस्ती, सुटे भाग विक्री दुकानदारांवर धडक कारवाई
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Potholes on internal roads due to rain in Pimpri city Pune news
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
mollywood actress rape marathi news
अन्वयार्थ: रुपेरी पडद्यावर बलात्काराचे डाग
Retired agriculture officer dies in collision with dumper
डंपरच्या धडकेत निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू- कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात अपघात
Atal Setu road crack case contractor was fined one crore rupees
अटल सेतूतील जोडरस्त्यावरील तडे प्रकरण : अखेर कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/gharkekalesh/status/1789262773995577829

हेही वाचा >> अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओला १४२.७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकरीही संताप व्यक्त करत महिलेवर जोरदार टीका करत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत “अन्याय फक्त स्त्रीयांवरच होत नाही” म्हंटलं आहे. तर आणखी एकानं या महिलेला अटक करण्याची विनंती केली आहे.

सोशल मीडियाचे जग हे वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ तर कधी भांडणाचे, तर कधी आर्ट क्राफ्ट असे व्हिडीओ इथे समोर येत असतात. लोक आपल्या आवडी प्रमाणे व्हिडीओ पाहातात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हा व्हिडीओ नवरा-बाकोमधील नात्याला तडा गेल्याचा आहे.